कल्याण : सोमवारी नारळी पौर्णिमा आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डामडौलातील दिखाव्याचा कार्यक्रम करण्यासाठी शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी वर्दळीच्या शिवाजी चौकात मंडप उभारण्याचा निर्णय घेतला. या चौकातील मंडपाला पोलीस, वाहतूक, गोपनीय पोलिसांचा विरोध असताना सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून शिवसेनेकडून रेटून शिवाजी चौकात मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपामुळे वाहन कोंडी होण्याची शक्यता विचारात घेऊन आमदार विश्वनाथ भोईर यांनी वाहन चालकांना पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याचे आवाहन समाज माध्यमातून केले आहे.

वाहतूक विभागाने या मार्ग बदलाची कोणतीही अधिसूचना काढली नसताना, आमदार भोईर यांनी स्वतःहून वाहन चालकांनी शिवाजी चौक मार्गाऐवजी पर्यायी रस्ते मार्गाने वाहने नेण्याचे आवाहन केले आहे. शिवाजी चौकात कोणताही कार्यक्रम नसताना दररोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत अगोदरच वाहन कोंडी असते. या चौकात आंदोलन, मोर्चा काहीही कार्यक्रम असेल तर शिवाजी चौक एक ते दोन तास कोंडीत अडकतो. या चौकापासून वाहनांचा रांगा दुर्गाडी चौक, लालचौकी, आधारवाडी चौक, काळा तलाव चौक भागात लागतात.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
raj thackeray shivaji park
MNS : शिवाजी पार्कातील मनसेची १७ तारखेची सभा रद्द, कारण देत राज ठाकरे म्हणाले….
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
The decision regarding the permission of the meeting at Shivaji Park Maidan is now with the Urban Development Department mumbai news
शिवाजी पार्क मैदानवरील सभेच्या परवानगीचा निर्णय आता नगरविकास विभागाकडे
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक

हेही वाचा…फुटबॉल स्पर्धा जिंकण्यासाठी नियमबाह्यरित्या खेळाडूंचा सहभाग, नवी मुंबईतील पालकांचा आरोप

या रांगांमुळे कल्याण शहरातील रस्ते वाहन कोंडीत अडकतात. पत्रीपुलाकडून येणारी वाहने या कोंडीत अडकतात. या वाहनांचा शिवाजी चौक ते पत्रीपूल आणि पुढे रांगा लागतात. हे माहिती असुनही आमदार भोईर यांनी लाडकी बहिण योजनेचा आणि नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम लोकांसमोर साजरा झाला पाहिजे म्हणून भर वर्दळीच्या शिवाजी चौकात मंडप टाकण्याचे नियोजन केले आहे.

गोपनीय विभागाने शिवाजी चौकात मंडप उभारणी केली तर अभूतपूर्व वाहन कोंडी या चौकात होऊन संपूर्ण शहर ऐन सणासुदीत कोंडीत अडकेल, हा विचार करून शिवसेनेला शिवाजी चौकात मंडप उभारणीस तीव्र आक्षेप घेऊन तसे लेखी पत्र वरिष्ठांना दिले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या कोंडीची माहिती देण्यात आली. पण राज्य सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने आणि या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे येणार असल्याने या कार्यक्रमाला विरोध करू नका, अशी चर्चा पोलीस वर्तुळात झाल्याने या मंडपाला यंत्रणांनी विरोध केला नसल्याचे समजते.

हेही वाचा…वैद्यकीय उपचारांच्या हलगर्जीपणातून डोंबिवलीतील शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू, गिता खरे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल

शिवाजी चौकात सोमवारी कोंडी झाली तर आणि काही गैरप्रकार झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आयोजक आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर टाकण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. आमदार भोईर यांनी मात्र शिवाजी चौकात मंडप असला तरी तेथे वाहन कोंडी होणार नाही अशी काळजी घेण्यात आली आहे, असे सांगितले.

हेही वाचा…छताचे प्लास्टर अंगावर पडून मुलाचा मृत्यू

शहर कोंडी मुक्त ठेवण्याची जबाबदारी पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचीही आहे. पण पालिका अधिकारी सुट्टी असल्याने आपल्या मुळ शहरात जात असल्याने पालिका अधिकाऱ्यांचेही या महत्वपू्र्ण विषयाकडे लक्ष नसल्याचे समजते.