शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’ प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला असून त्यापाठोपाठ बाळासाहेबांच्या शिवसेनेने रविवारी ठाण्यात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन ठाकरे गटाला पुन्हा धक्का दिला आहे.ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे, माजी आमदार योगेश पाटील आणि ठाकरे गटासह विविध पक्षातील पुणे, लातूर, मुंबई, ठाणे आणि पालघर भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रविवारी शिंदे गटाने रविवारी ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद मठात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन ठाकरे गटाला पुन्हा धक्का दिला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हे सरकार असल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया वैजनाथ वाघमारे यांनी दिली.

दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश रखडला ?
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि त्याआधीही दीपाली सय्यद सक्रिय झाल्याचे चित्र दिसत होते. ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठीही त्या प्रयत्न करत होत्या. पण पक्षात सुषमा अंधारे यांचा प्रवेश झाल्यापासून दीपाली सय्यद फारशा सक्रिय झालेल्या दिसत नाहीत. त्या नाराज असल्याने शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असतानाच, त्या रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांचा प्रवेश झालाच नाही. दीपाली सय्यद यांनी ठाकरे गटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने भाजप महिला मोर्चाने त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला विरोध केला आहे. त्यांनी आधी पंतप्रधान मोदी यांची माफी मागावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या ठाणे शहराध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी केली आहे.