ठाणे : शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही गटांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू असतानाच, दसरा मेळाव्याच्या काही तास आधी शिवसेना (शिंदे गट) फेसबुक पेजवरून उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र रावणाच्या रूपात मांडले आहे. त्यात गद्दारीला धडा शिवसैनिकच शिकवणार असा उल्लेख करण्यात आला आहे. रावणाला शरद पवारांसह, प्रकाश आंबेडकर, अऱविंद केजरीवाल, आदित्य ठाकरे, राहूल गांधी आणि मेहबुबा मुफ्ती यांचे मुखवटे लावण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत आज शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानात तर, ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. हे मेळावे यशस्वी करण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू असून त्याचबरोबर मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गट एकमेकांवर टिका-टिप्पणी करत आहेत. त्याचबरोबर सोशल मिडीया आणि जाहिरातींच्या माध्यमातूनही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून होत आहे. शिंदेच्या शिवसेनेचे अधिकृत फेसबुक पेज आहे. यावर दसरा मेळाव्याच्या काही तास आधी उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र रावणाच्या रूपात मांडण्यात आले आहे. रावणाच्या दहा तोंडांना शरद पवारांसह, प्रकाश आंबेडकर, अऱविंद केजरीवाल, आदित्य ठाकरे, राहूल गांधी आणि मेहबुबा मुफ्ती यांचे मुखवटे लावण्यात आले आहेत. तसेच गद्दारीला धडा शिवसैनिकच शिकवणार असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांना एकप्रकारे इशारा देण्यात आला आहे. या व्यंगचित्रामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde group attacked uddhav thackeray directly from uddhav thackeray cartoon on facebook page amy