माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात विकास कामांसाठी निधी मिळत नाही म्हणून तणतण करत ३९ जण एकनाथ शिंदे यांच्या सोबत निघून गेले. आता किती, कोणाला निधी मिळाला. त्यातून काय कामे झाली. आपल्या लेकाच्या (मुलगा) मतदारसंघात रस्ते कामांसाठी हजार कोटीचा निधी आला आहे. तरीही रस्ते का काचेसारखे गुळगुळीत, असा खोचक प्रश्न करत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चिरंजिव खा. डाॅ. श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्याण मध्ये टीकेचे लक्ष्य केले.
हेही वाचा >>>ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच
महाप्रबोधन यात्रेनिमित्त नेत्या अंधारे कल्याण पूर्वेत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना, भाजप नेते यांना लक्ष्य केले.कल्याण मधील कार्यक्रमासाठी यायचे म्हणून लवकरच एका खासगी कार्यक्रमासाठी कल्याण परिसरातील नातेवाईकांकडे आले होते. येताना कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांची परिस्थिती पाहून या शहरासाठी ३६० कोटी, त्यानंतर एक हजार कोटीचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. शिंदे यांनी आणला. तो गेला कुठे असा प्रश्न पडला. कल्याण, डोंबिवलीतील काचे सारखे गुळगुळीत रस्ते पाहून आमचे वाहन रस्त्यावरुन घसरते की काय अशी भीती आम्हाला वाटत होती. रस्ते कामांसाठी आलेला निधी गेला कुठे, असे प्रश्न उपस्थिती करत उपनेत्या अंधारे यांनी खा. शिंदे यांना लक्ष्य केले.
हेही वाचा >>>ठाणे विभागीय अंतिम फेरी जल्लोषात; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भाजप, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाविषयी काही बोलले की कायदेशीर नोटिसा, खोट्या तक्रारी केल्या केल्या जातात. अशा कितीही नोटिसा पाठविल्या तरी आपण आपले समाज हिताचे काम सुरूच ठेवणार आहोत. कल्याण मध्ये अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या तक्रारी करण्याचे काम सुरू आहे. हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. हे जनतेला काळत नाही का. आपले बोलणे खा. शिंदे यांच्या खबऱ्यांनी जरुर गुपचूप ध्वनीमुद्रित करुन ते त्यांना पोहचविण्याची व्यवस्था करावी. कारण त्या खबऱ्यांचे जीवनच अर्धी बिर्याणीवर अवलंबून आहे, असेही अंधारे म्हणाल्या.