कल्याण- कल्याण पूर्वेतील पीडित मुलीवर एका सराईत गु्न्हेगाराने बुधवारी संध्याकाळी बलात्काराचा प्रयत्न केला. या मुलीसह तिचे कुटुंब या घटनेने हादरले आहे. अशा परिस्थितीत कोळसेवाडी पोलिसांनी पीडित मुलीसह तिच्या कुटुंबीयांना रात्री साडे बारा वाजता पोलीस ठाण्यात बोलावून तिची दोन तास चौकशी केली. त्यानंतर अडीच वाजता तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. हा प्रकार खूप गंभीर आहे, अशी नाराजी शिवसेनेच्या (उबाठा) महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पोलिसांना निवेदन दिल्यानंतर व्यक्त केली.

हेही वाचा >>> पावसाने उघडीप दिल्याने कल्याण-डोंबिवलीत खड्डे बुजविण्याची कामे जोमाने

582 citizens benefited from the medical services of Vighnaharta Nyas
‘विघ्नहर्ता न्यास’च्या वैद्यकीस सेवेचा ५८२ नागरिकांना लाभ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
youth threatens to kill family over old conflict at shahad near kalyan
कल्याण जवळील शहाड येथे जुन्या भांडणातून  कुटुंबाला ठार मारण्याची तरूणाची धमकी
To support hunger strike Dhangar community member climbed mobile tower
बुलढाणा : तब्बल दहा तास टॉवरवर चढून आंदोलन; उडी घेण्याचा…
Gym Owner Killed in Delhi
Gym Owner Murder : दिल्लीतल्या जिम मालकाची गोळ्या झाडून हत्या, लॉरेन्स बिश्नोई गँगचं ‘हे’ कनेक्शन समोर
hm amit shah instructions to distribute seats according to ability to win assembly elections
जिंकून येण्याच्या क्षमतेनुसारच जागावाटप; अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना बजावले
Vasind police station, three employees Suspension,
वासिंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्याचे निलंबन, तरुणाच्या मृत्यूनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
Rape in Uttarpradesh
Rape in UP : रात्री शौचास गेली अन् शाळेतील शिपायांनी रोखलं; १३ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उजेडात!

पीडितेचे कुटुंब बलात्कारासारख्या घटनांमुळे हादरलेले असते. अशा कुटुंबीयांना सकाळच्या वेळेत चौकशीसाठी बोलविण्याऐवजी पोलीस रात्रीच्या वेळेत बोलवित असतील तर ते चुकीचे आहे. हे प्रकार यापुढे थांबले पाहिजेत, अशी मागणी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

शिवसेनेच्या (उबाठा) कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे, शहर संघटक मीना माळवे, शहरप्रमुख शरद पाटील, सुनीता ढोले, पल्लवी बांदवडेकर, कल्पना मुसळे, संगीता गांधी, भारती भोसले, योगिता ताजणे, राधिका गुप्ते, साधना पार्टे, सीमा वेदपाठक यांनी गुरुवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांची भेट घेतली. त्यांना पीडितेवर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुन्हा तडीपारी होईल यादृष्टीने कारवाई करण्याची मागणी केली.

हेही वाचा >>> शहापूर जवळील आटगाव येथे शालेय वाहनाच्या धडकेत चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू

बलात्काराची घटना घडल्यानंतर घटना घडलेले कुटुंब अस्वस्थ असते. त्यांना धीर देण्याची गरज असते. त्यामुळे पोलिसांनी तपास करायचा असेल तर अशा कुटुंबाच्या घरी जाऊन तपास करावा. रात्रीअपरात्री पीडित कुटुंबाला, पीडितेला पोलीस ठाण्यात बोलावून तपास करू नये, अशी मागणी जिल्हा संघटक विजया पोटे यांनी केली. कोळसेवाडी मधील पीडितेला रात्री साडे बारा वाजता बोलावून दीड तास चौकशी झाल्यानंतर तिला रात्री अडीच वाजता पालिका रुग्णालयात वैदयकीय तपासणीसाठी पोलिसांकडून पाठविण्यात आले. हे चुकीचे आहे. असे प्रकार यापुढे होऊ नयेत, अशी मागणी महिला आघाडीने केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे, किरण निचळ उपस्थित होते.