ठाणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण संपूर्ण देशभर गाजत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी या प्रकरणी थेट भूमीका घेत या प्रकरणात संशयीत आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला फासावर लटकवा अशी मागणी केली आहे. म्हस्के यांनी मस्साजोग प्रकरणात प्रथमच जाहीर भूमीका मांडताना मंत्री धनंजय मुंडे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय असलेल्या कराडचा उल्लेख क्रुरकर्मा असाही केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्याचे शिवसेना पक्षाचे खासदार असलेले नरेश म्हस्के हे या पक्षाची भूमीका आक्रमकपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. सोमवारी काही दुरचित्रवाहिन्यांवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील छायाचित्र झळकताच समाजमनात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. खासदार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी सकाळीच याप्रकरणी ट्विट करताना वाल्मिकी कराडला फासावर लटकवा अशी मागणी करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

‘एकेकाळी पाणक्या म्हणून काम करणाऱ्या वाल्मिक कराडने आणि त्याच्या साथीदारांनी बीडमध्ये गुंडगिराची उच्चांक गाठला आहे. आपल्या दुष्कृत्यांमुळे हा माणूस आज सगळ्यांना डोईजड झाला आहे. सामान्य लोकांबरोबरच तिकडच्या ग्रामसेवक, सरपंच आणि माजी नगरसेवकांनाही यांनी देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. माणुसकीला काळीमा फासणारे असुरी कृत्य त्याने केले आहे. महाराष्ट्र सरकारने अशा वर्तमानकालीन क्रुरकर्मा अैारंग्याला आणि त्याच्या साथीदारांना फासावर लटकावयाला हवे’ अशी भूमीका म्हस्के यांनी मांडली आहे. हा संपूर्ण खटला फास्ट ट्रकवर चालवा अशी मागणीही म्हस्के यांनी केली आहे. ‘सामान्य माणसासाठी शिवसेना कायम कटिबद्ध राहीली आहे. या प्रकरणी आज शिवसेनेतर्फे आम्ही आंदोलन उभारणार असून आमचा निषेध सरकारपर्यत पोहचविणार आहे, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेची आक्रमक भूमिका

या प्रकरणी शिवसेना ठाण्यापासून आंदोलन सुरु करेल आणि पुढे ते राज्यव्यापी केले जाईल अशी माहिती शिंदेसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. कराड प्रकरणात अजित पवार यांच्या पक्षाचे मंंत्री धनंजय मुंडे यापुर्वीच अडचणीत आले आहेत. असे असताना शिंदे यांच्या पक्षाने याप्रकरणी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचे जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशा प्रकरणात आंदोलन उभे करणे हे आमच्या पक्षाचे कर्तव्य आहे असे म्हस्के यांनी जाहीर केले आहे.