ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातुन विजयी झालेले भाजपचे उमेदवार संजय केळकर यांना राबोडी परिसर वगळता नौपाड्यापासून ते घोडबंदरपर्यंतच्या ९ पैकी ८ प्रभागात मताधिक्य मिळाले तर, मुस्लीम बहुल मतदार असलेल्या राबोडी प्रभागात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना मताधिक्य मिळाल्याचे समोर आले आहे. मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना एकाही प्रभागात मतांची आघाडी मिळालेली नाही. यानिमित्ताने राजन विचारेंची राबोडीत तर, संजय केळकरांची संपुर्ण ठाण्यात गाडी सुसाट गेल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर, ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यात तिरंगी लढत होती. या निवडणुकीत संजय केळकर यांना १ लाख २० हजार ४२४ मते मिळाली. ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना ६२ हजार १४१ मते तर, मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना ४२ हजार ८०७ इतकी मते मिळाली. या निवडणुकीत केळकर हे ५७ हजार २२८ मताधिक्य घेत विजय संपादन केला.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’

हेही वाचा…वाहतूक कोंडी टाळण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते, फुले रोड एक दिशा मार्ग

ठाणे शहर विधानसभा मतदार संघामध्ये ठाणे महापालिकेचे एकूण नऊ प्रभाग येतात. यामध्ये हिरानंदानी इस्टेट भागातील प्रभाग क्रमांक २, मानपाडा, कोलशेत भागातील प्रभाग क्रमांक ३, कापुरबावडी, हिरानंदनी मेडोज भागातील प्रभाग क्रमांक ४, बाळकुम भागातील प्रभाग क्रमांक ८, राबोडी भागातील प्रभाग क्रमांक १०, गोकुळनगर भागातील प्रभाग क्रमांक ११, पाचपाखाडी, टेकडीबंगला, सिद्धेश्वर तलाव परीसरातील प्रभाग क्रमांक १२, नौपाडा भागातील प्रभाग क्रमांक २१ आणि खारकरआळी, टेंभीनाका भागातील प्रभाग क्रमांक २२ यांचा समावेश आहे. संजय केळकर यांना प्रभाग क्रमांक २ मध्ये १० हजार ४४२, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ४ हजार ५६३, प्रभाग क्रमांक ४ मध्ये ७ हजार २०१, प्रभाग क्रमांक ८ मध्ये ९ हजार ७४०, प्रभाग क्रमांक ११ मध्ये ७ हजार ३५९, प्रभाग क्रमांक १२ मध्ये ६ हजार १६, प्रभाग क्रमांक २१ मध्ये ११ हजार २८९ आणि प्रभाग क्रमांक २२ मध्ये ८ हजार ९९३ असे मताधिक्य मिळाले. तर, ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना मुस्लिम बहुल मतदार असलेल्या राबोडी येथील प्रभाग क्रमांक १० मध्ये ८ हजार ५५७ इतके मताधिक्य मिळाले आहे. हा प्रभाग वगळता त्यांना कुठेही मताधिक्य मिळालेले नाही.

मताधिक्य आकडेवारी

प्रभाग क्रमांक            संजय केळकर राजन विचारे अविनाश जाधव             
प्रभाग क्रमांक -२     १५,५५७       ५,११५        ४,११७
प्रभाग क्रमांक -३     ११,५२१         ६,९५८          ५,३०९
प्रभाग क्रमांक -४     ११,५२२        ४,३२१          २,१५०
प्रभाग क्रमांक -८      १५,३६६         ५५०३           ५,६२६
प्रभाग क्रमांक -१०     ५,६१९          १४,१७६         २,८९५
प्रभाग क्रमांक -११    १४,५९२       ७,२३३           ५,२३९
प्रभाग क्रमांक -१२    १३,६६१        ६,७१३          ७,६४५
प्रभाग क्रमांक -२१     १५,७१९       ४,४३०           ४,२१३
प्रभाग क्रमांक -२२    १६,२३२       ७,२३९          ५,३५५
पोस्टल              ६३५          ४५३            २५८
एकूण             १,२०,४२४     ६२,१४१        ४२,८०७

Story img Loader