ठाणे : लोकसभा निवडणुका जवळ येत असताना, ठाण्यातील राजकारणामध्येही विविध चर्चांना उधान येत आहे. राजकारणात कोण कोणासोबत जाईल याबाबत काही सांगितले जात नाही. शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार राजन विचारे हे त्यांचे पूर्वीचे सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यापूर्वीही अशा चर्चा रंगत होत्या. परंतु राजन विचारे यांनी याबाबत प्रत्येकवेळी खंडन केले होते. बुधवारी राजन विचारे यांनी पुन्हा इन्स्टाग्राम या त्यांच्या समाजमाध्यमावर पोस्ट टाकत ‘पाठीला पाय लावून पळून जाणं, बंडाचा नाही तर षंडाचा प्रकार आहे’ असे म्हटले. तसेच त्या पोस्ट खाली ‘निष्ठावान- राजन विचारे’ असे म्हटले. राजन विचारे यांची ही पोस्ट सध्या प्रसारित होत आहे.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. भाजपने त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाविषयी चर्चा सुरू आहे. ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून पुन्हा तिकीट मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून जाहीर चौकसभांमध्ये घोषणा देखील केली जात आहे. असे असले तरी अनेकदा राजन विचारे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत जातील अशा चर्चा रंगविल्या जात होत्या. राजन विचारे यांनी या चर्चांचे खंडन देखील केले होते. काही दिवसांपासून पुन्हा या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर राजन विचारे यांनी त्यांच्या इन्टाग्रामवरील खात्यावरून एक पोस्ट टाकली आहे. तसेच ‘पाठीला पाय लावून पळून जाणं, बंडाचा नाही तर षंडाचा प्रकार आहे’ असे या पोस्टमध्ये लिहीले आहे. त्याखाली ‘निष्ठावान- राजन विचारे’ असा उल्लेख केला आहे. ही पोस्ट सध्या ठाण्यात प्रसारित होत आहे. या पोस्टमुळे राजन विचारे यांनी पुन्हा एकदा या चर्चांना पुर्णविराम दिल्याचे बोलले जात आहे.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी