ठाणे : लोकसभा निवडणुका जवळ येत असताना, ठाण्यातील राजकारणामध्येही विविध चर्चांना उधान येत आहे. राजकारणात कोण कोणासोबत जाईल याबाबत काही सांगितले जात नाही. शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार राजन विचारे हे त्यांचे पूर्वीचे सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यापूर्वीही अशा चर्चा रंगत होत्या. परंतु राजन विचारे यांनी याबाबत प्रत्येकवेळी खंडन केले होते. बुधवारी राजन विचारे यांनी पुन्हा इन्स्टाग्राम या त्यांच्या समाजमाध्यमावर पोस्ट टाकत ‘पाठीला पाय लावून पळून जाणं, बंडाचा नाही तर षंडाचा प्रकार आहे’ असे म्हटले. तसेच त्या पोस्ट खाली ‘निष्ठावान- राजन विचारे’ असे म्हटले. राजन विचारे यांची ही पोस्ट सध्या प्रसारित होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा