बदलापूर : बदलापूर शहरातील चुकीच्या पूररेषेचे पाप त्यांचे आहे. त्यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला नसता तर चुकीची पूररेषा पडली नसती, असे सांगत आपण चष्मा खाली करणाऱ्या कोणालाही घाबरत नाही असा हल्लाबोल शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यावर केला. विधानसभा निवडणुकीपासून म्हात्रे आणि कथोरे यांच्यात विस्तवही जात नाही. विजयानंतर पहिल्याच भाषणात कथोरे यांनी वामन मात्रे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. त्यावरून म्हात्रे यांनी नुकतेच वक्तव्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुरबाड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीवेळी महायुतीतील शिवसेना आणि भाजप या दोन पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये उघड वाद पाहायला मिळाला. आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेचे स्थानिक उपशहर प्रमुख यांना भाजपात प्रवेश दिल्याने शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे नाराज झाले होते. त्यामुळे म्हात्रे यांनी किसन कथोरे यांच्या प्रचारापासून अंतर ठेवले होते. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही प्रचारापासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याचे बोलले जात होते. त्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः शिवसेनेच्या वरिष्ठ नगरसेवकांना फोन करून प्रचारात सक्रिय होण्याचे आदेश दिले होते. तसेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी किसन कथोरे यांच्यासाठी विशेष मेळावा घेतला. किसन कथोरे यांना विजयी करावेच लागेल, शिवसेनेचे जे इच्छुक प्रचार करणार नाहीत आणि ज्यांच्या प्रभागात कथोरे यांना कमी मतदान मिळेल त्यांना तिकीट मिळणार नाही असा इशाराही शिंदे यांनी सर्वांना दिला होता. त्यावेळी बोलताना शिंदे यांनी कथोरे यांनाही कानापिचक्या दिल्या होत्या. तुम्ही वामन म्हात्रे याची खोडी काढली आहे. ती तातडीने दुरुस्त करा असा सल्ला शिंदे यांनी कथोरे यांना दिला होता. मात्र त्यानंतरही म्हात्रे आणि कथोरे यांच्यात सुसंवाद होऊ शकला नाही.

हेही वाचा…दहशतवादी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची भिवंडीत कारवाई, भिवंडीतून आठ बांगलादेशी अटकेत

नुकतेच वामन म्हात्रे यांनी एका पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले यावेळी बोलताना मात्र यांनी किसन कथोरे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला . विजयानंतरच्या पहिल्या भाषणात किसन कथोरे यांनी आपण जेव्हा चष्मा खाली करतो त्यावेळी कोणाला सोडत नाही, असे सांगत वामन म्हात्रे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. त्याच मुद्द्यावर बोट ठेवत म्हात्रे यांनी आपण चष्मा खाली करणाऱ्यांना घाबरत नाही असे प्रत्युत्तर दिले. बदलापूर शहरातील पूररेषेचा प्रश्न आपण लवकरच सोडू. पूर रेषा हे त्यांचेच पाप आहे, ज्यांनी हा विषय विधानसभेत उपस्थित केला असे सांगत म्हात्रे यांनी कथोरे यांना पुरेरेषेबाबत अप्रत्यक्षरीत्या दोषी ठरवले. त्यामुळे येत्या काळात म्हात्रे आणि कथोरे यांच्यातील वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.