कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका लावल्याने पक्षातील जुन्या जाणत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण येत्या काही महिन्यांमध्ये जाहीर होणार आहे. आरक्षणाची स्थिती स्पष्ट होताच परपक्षातील काही नगरसेवक शिवसेनेत दाखल होण्याची चिन्हे आहेत. या ‘उपऱ्यां’मुळे आपले काय होणार, अशी चिंता शिवसेनेतील निष्ठावंतांना सतावू लागली असून यामुळे पक्षात आतापासूनच नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
अनेक वर्षांपासून शिवसेनेचे प्रभागातील बालेकिल्ले सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केवळ दिग्गज नगरसेवक सेनेत येणार म्हणून बाजूला सारण्यात येत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा नाराजांकडून दिला जात आहे. या निष्ठावान शिवसैनिकांची नाराजी ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेला महागात पडेल, असा इशारा निष्ठावान शिवसैनिकांनी दिला आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराजांना गळाला लावण्याची रणनीती शिवसेना नेत्यांनी अवलंबली होती. यापैकी बहुतांश नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांना बऱ्यापैकी आव्हान देणे शिवसेनेला शक्य झाले. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेची मोठी ताकद असली तरी भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराजांना गळाला लावण्याची रणनीती आखली जात आहे. डोंबिवलीतील मनसेचे काही नगरसेवक भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कँाग्रेस, राष्ट्रवादीतील इच्छुकांना गळाला लावत भाजपपुढे आव्हान उभे करण्याची रणनीती असली तरी स्थानिक नेत्यांची नाराजी कशी दूर करायची, हा प्रश्न पक्षाच्या नेत्यांना सतावू लागला आहे.
शिवसैनिक अस्वस्थ!
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका लावल्याने पक्षातील जुन्या जाणत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-06-2015 at 01:37 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsainiks in kalyan dombiwali feeling uneasy