|| सागर नरेकर

गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ या पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. केंद्रात आणि राज्यात भाजपची लाट जोरात असतानाही येथील नगरपालिकेत शिवसेनेने एकहाती सत्ता प्रस्थापित केली.असे असले तरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासमोर पक्षांतर्गत विरोधकांचेच मोठे आव्हान असणार आहे.

zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
Jitendra Awhad gave friendly advice to Minister pratap sarnaik
जितेंद्र आव्हाड यांनी दिला मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान

अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेल्या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात दोन वेळा शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर आमदार म्हणून निवडून आले. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष स्वबळावर लढल्याने येथे भाजपच्या राजेश वानखेडे यांनी शिवसेनेच्या विद्यमान आमदार डॉ. किणीकरांना कडवी झुंज दिली होती. त्यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेश तपासे यांचा १९ हजार ९७९ मतांनी पराभव केला होता.

गेल्या काही वर्षांत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.  काही महिन्यांपासून अंबरनाथमध्ये विविध कार्यक्रमांतून भाजपने ताकद वाढवली आहे. युती झाल्यास भाजपची ताकद किणीकर यांना मिळणार आहे. मात्र पक्षातील विरोधकांना थोपवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.

२०१४ चा निकाल

  • डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना) ४७०००
  • राजेश वानखेडे (भाजप) ४४९५९
  • कमलाकर सूर्यवंशी
  • (राष्ट्रवादी काँग्रेस) १५७४०

विकासकामांची मंदगती

या मतदारसंघात न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवासी शाळा, टोलेजंग पोलीस वसाहती, बार्टी केंद्र अशा एकाहून एक अनेक आदर्श प्रकल्प मंजूर झाले आहेत. मात्र ते पूर्णत्वास जाणे बाकी आहे. शहरातील कल्याण-बदलापूर रस्त्याचा प्रश्न अनुत्तरीत आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून पाच महत्त्वाच्या रस्त्यांसाठी निधी आला खरा मात्र त्यातही दिरंगाई दिसली. शहरातला पहिला बाह्य़वळण रस्ताही सध्या चिखलात आहे. गेल्या दहा वर्षांत एक नवा उड्डाणपूलही मिळू शकलेला नाही. त्यामुळे शहरातली रस्ते वाहतूकही कोंडीत सापडली आहे.  एकमेव आणि खुले यशवंतराव चव्हाण नाटय़गृह पाडून त्याचे वाहनतळात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला गेला, मात्र अजून वाहनतळही अपूर्ण आहे. नाटय़गृह अद्याप कागदावरच आहे.  मतदार म्हणतात, आमदारांचे उल्हासनगरकडे  कमी लक्ष आहे. कॅम्प चार आणि पाचला महामार्गापर्यंत जोडण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडून होणे अपेक्षित होते. झोपडपट्टी पुनर्वसनात काम होणे गरजेचे होते.  – संतोष महाडेश्वर, डिझायनर

सध्या शहरात जुन्या कंपन्यांच्या ठिकाणी लघुउद्योजकांसाठी वाणिज्य संकुले उभी राहत आहेत. त्यामुळे लहान-मोठय़ा उद्योगांना बळ मिळणार आहे. मात्र  नवउद्योजकांसाठी कल्याणकारी कामे होणे गरजेची आहेत.  – अंकिता भागवत, उद्योजिका, अंबरनाथ.

गेल्या दहा वर्षांत शहरातील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात यश आले आहे. काही कामे पूर्ण झाली आहेत, काही प्रगतिपथावर आहेत. लवकरच उद्योगक्षेत्र वाढून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.– डॉ. बालाजी किणीकर, आमदार, अंबरनाथ विधानसभा

Story img Loader