बदलापूर शहरात शनिवारी शिवसेनेचे शाखाप्रमुख केशव मोहिते यांच्यावर धारदार शस्त्राचे वार करून त्यांची हत्या करण्यात आली. आज सकाळी सातच्या सुमारास येथील एमआयडीसी परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. केशव मोहिते हे व्यवसायाने रिक्षाचालक असून सकाळच्या वेळेत एमआयडीसी परिसरात होते. त्यावेळी तीन अनोळखी लोक त्यांच्या रिक्षात प्रवासी म्हणून बसले. त्यानंतर चालत्या रिक्षातच त्यांनी मोहिते यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहिते यांना डोंबिवलीमधील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. मोहिते यांच्या हत्येच्या निषेधार्थ शहरातील रिक्षा बंद ठेवण्यात आल्या. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे सध्या संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण आहे.

Story img Loader