Petrol at Rs 1 per litre in Thane: पेट्रोल-डिझेलचे दर रोज वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढत आहे. इंधनाचे वाढते दर चिंतेत भर टाकत असताना ठाणेकरांना मात्र आज फक्त एका रुपयात एक लिटर पेट्रोल मिळणार आहे. हे कसं काय शक्य आहे असा विचार करत असाल ना…हो तुम्ही बरोबर वाचलंत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्षाने हा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून आजचे दर जारी; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कापूरबावडी येथील तत्वज्ञान विद्यापीठाजवळील कैलाश पेट्रोल पंपावर फक्त एका रुपयात पेट्रोल दिलं जाणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून एक रुपयात एक लिटर पेट्रोल दिलं जाणार आहे. सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले असताना ठाणेकर या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी गर्दी करण्याची शक्यता आहे. प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे.
आजचा पेट्रोल आणि डिझेलचा दर काय?
ठाण्यामध्ये आज पेट्रोलचा दर लीटरमागे १२० रुपये ५८ पैसे असून डिझेलचा दर १०४ रुपये ८३ पैसे इतका आहे.
आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापुरात १ रुपये लीटर दराने मिळत होतं पेट्रोल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti 2022) सोलापुरामध्ये एका रुपयात एक लीटर दराने पेट्रोल वितरीत करण्यात आलं होतं. जवळपास ५०० लिटरपर्यंत पेट्रोल या योजनेअंतर्गत देण्यात आलं होतं. “आज इंधनाचे दर ११० रुपयांपर्यंत गेलेत. मोदी सरकारचा निषेध आणि बाबासाहेब जंयतीनिमित्त आम्ही हा छोटासा उपक्रम राबवत आहोत,” असं राहुल सर्वगोड यांनी यावेळी सांगितलं होतं.