ठाणे : ज्यांनी पक्षावर ही वेळ आली आणि ती रावणाची औलाद असा उल्लेख करत शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे यांनी शिंदे गटावर टीका केली. शिवसेनेचा जन्म संघर्षातून झालाय. आता गप्प बसणार नाही. दसऱ्याला १० तोंडाचा रावण जाळला. आता ४० तोंडाचा रावण जाळायचा आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत. चिन्ह कुठलेही असो आम्हीच निवडणूका जिंकू असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा >>> डोंबिवली : धनुष्यबाण गोठविल्याने शिवसेनाप्रमुखांची आयु्ष्याची मेहनत धुळीला ; राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची खंत
हेही वाचा >>> डोंबिवली : चिन्ह गोठविण्यावरुन मनसेचा शिंदेंना चिमटा तर ठाकरेंचा कैवार
ठाणे शहरातुन महाप्रबोधन यात्रेला ठाकरे गटाने सुरुवात केली असून या यात्रेच्या निमित्ताने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रविवारी जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. आमचा स्वाभिमान असलेले चिन्ह आणि नाव गोठवले. पण, आमचे रक्त आणि मशाली पेटवल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा >>> ठाणे : शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला उद्यापासून ठाण्यातून सुरुवात ; यात्रेननिमित्ताने जाहीर मेळाव्याचे आयोजन
तुम्ही सातत्याने म्हणता आमच्यावर अन्याय झाला. पण आनंद दिघे गेल्यानंतर तुम्ही किती जणांवर अन्याय केला. आम्ही त्यावर काहीच बोलत नव्हतो. कारण शिवसेना कुटुंब असल्यामुळे आम्ही गप्प होतो, असा आरोपही त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता केला. शिवसेनेचा जन्म संघर्षातून झालाय. आता गप्प बसणार नाही. दसऱ्याला १० तोंडाचा रावण जाळला. आता ४० तोंडाचा रावण जाळायचा आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत. चिन्ह कुठलेही असो आम्हीच निवडणूका जिंकू असेही त्या म्हणाल्या. महाराष्ट्र नेस्तनाबुत करण्यासाठी निघालेल्यांच्या मागे तुम्ही गेला आहात, असे त्यांनी शिंदे गटाला सांगत महाराष्ट्राचे वतन तुमच्या हाती असल्याचे आवाहन त्यांनी ठाकरे गटातील शिवसैनिकांना यावेळी केले.