एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या भारतात सण-उत्सवांना तोटा नाही. सण-उत्सव काळात लोकांची उत्साहस्थिती अर्थव्यवस्थेची गती वाढवणारी ठरावी इतकी खरेदीस पोषक बनते. बाजारातील प्रत्येक आकर्षक गोष्ट घरात आणण्याचा मनसुबा आर्थिक वकुबानुरूप कमी-अधिक होतो. सण-उत्सव काळात प्राणीपालक स्वत:साठी कपडे, दागिने यांची खरेदी आणि खाण्यापिण्याची चंगळ करताना आपल्या पेट्सलाही त्या-त्या सणांनुरूप आनंदी ठेवण्याची गरज व्यक्त करू लागले. ती गरज ओळखून गेल्या दशकभरात आपल्याबरोबरच घरातील ‘श्वानुल्यां’चे आणि मनीचे लाड करण्यासाठी उत्सवकालीन पेटबाजारपेठ तयार झाली आहे. कपडे, दागिने, खेळणी यांबरोबरच प्राण्यांसाठी त्यांच्या आवडीच्या सुग्रास जेवणाचे डबे पोहोचवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. मे महिना, दिवाळी आणि नाताळच्या सुट्टीचा एकत्रित आनंद घेण्यासाठी प्राणी आणि त्यांच्या पालकांसाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स सुरू झाली आहेत. लाडाकोडात वाढवत असलेल्या श्वानुल्यांसाठी बाजारातील सर्वच नवी ट्रेंड्स भारतीयांनी स्वीकारली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा