ठाणे – जालन्यातील मराठा आंदोलनात झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे आज ठाणे बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमुळे ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठ, टेंभीनाका कोपरी, वागळे इस्टेट भागातील दुकाने बंद आहेत. सध्या टीएमटीची वाहतूक सुरळीत आहे. तर रिक्षांची संख्या दररोजच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे नोकरदार आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. सायंकाळी ४ वाजता मोर्चातील सहभागी ठाणे महापालिकेसमोर जमणार आहेत.

हेही वाचा >>> ठाण्यात तीन डब्यांची मेट्रो; केंद्र सरकारची महापालिकेला सूचना

बंदमुळे शाळा सुरू आहेत की नाही या बाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे मोर्चातील सहभागी मराठा नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद समाजातील अनेक स्तरांवर उमटताना दिसत आहेत. असे असतानाच मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे आज ठाणे बंद ठेवण्यात आला आहे. या बंदला सर्वपक्षीय पाठिंबा देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात निर्माणधीन इमारतीची उदवाहक कोसळली; ६ कामगारांचा मृत्यू तर दोनजण गंभीर जखमी

ठाणे शहरात बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ठाणे पोलिसांकडून शहरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरात तैनात आहेत. सकाळी ७.३० वाजल्यापासून बाजारपेठेत दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत होते. काही दुकानदारांनी दुकाने स्वतः बंद ठेवून बंद मध्ये सहभाग घेतला. शहरातील ठाणे बाजारपेठ, कोपरी काही अंतर्गत भागात दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवा आम्ही बंद करत नसल्याचा तसेच शांततेत बंद पाळला जात असल्याचा दावा सहभागी पक्षाचे नेते करत आहेत. वाहतूक व्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नसला तरी रोजच्या तुलनेत रिक्षांची संख्या कमी आहे. त्याचा फटका प्रवासी आणि नोकरदारांना बसला. बंदमुळे दुपारी शाळा सुरू आहेत की नाही या बाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Story img Loader