शहरातील वर्तकनगर भागात दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून यामध्ये चोरटय़ांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला. ठाण्यातील मुंबई द्रुतगती महामार्गालगत असलेल्या आनंद इमारतीत कमलेश तापीशंकर गोर (४१) राहत असून त्यांचे वसंतविहार भागातील लोकपूरम परिसरात मिठाईचे दुकान आहे. शनिवारी रात्री चोरटय़ांनी दुकानाच्या शटरची पट्टी उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानाच्या गल्ल्यातून ४७ हजार ५०० रुपयांची रोकड लुटून नेली. वर्तकनगर भागातील साईबाबा मंदीराजवळ राहणारे जेफ्री रिचर्ड रसल (४८) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ाने सव्वा लाखांचा ऐवज लुटून नेला. त्यामध्ये ८५ हजारांची रोकड, चांदीचे हार, कपडे आणि गॉगल यांचा समावेश आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या घटनांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
बिल्डरला खंडणीसाठी धमकी
कल्याण : येथील हाजीमलंग परिसरात विरेंद्र प्रताप अवधनारायण (४६) राहत असून ते बांधकाम व्यावसायिक आहेत. रविवारी दुपारी विरेंद्र आणि त्यांचा मुलगा कारमधून जात होते. दरम्यान, हाजीमंगल परिसरातील रस्त्यावर कारमधून आलेल्या गुंडांनी त्यांची कार अडवली. त्यांना गाडीतून बाहेर खेचून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडे १८ लाखांची खंडणी तसेच त्यांच्या बांधकाम साईटवर सप्लायरचे काम देण्याची मागणी केली. तसेच पैसे दिले नाहीतर जीवे मारण्यात येईल, अशी धमकी त्यांना दिली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात राकेश कदम आणि सचिन माने या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा