ठाणे : ठाणे आणि घोडबंदर भागातून जाणाऱ्या महामार्ग आणि त्यावरील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्डयांमुळे नागरिक त्रस्त असतानाच, खड्डे भरणीसाठी उपयुक्त ठरत असलेल्या मास्टिकची (उच्च प्रतीचे डांबर) मागणी वाढल्याने त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे खड्डे भरणीची कामे करायची कशी, असा प्रश्न ठाणे पालिकेसह सर्वच यंत्रणा पडला आहे. दरम्यान, खड्डे भरण्यासाठी मास्टीक जलदगतीने उपलब्ध करुन घेण्याच्या सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नगर अभियंयांसह उपनगर अभियंत्यांना बैठकीत दिल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पावसाळ्यात दरवर्षी खड्डे पडतात. त्यात शहरातून महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. हे रस्ते पालिका क्षेत्रात असले तरी ते सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत येतात. या सर्वच रस्त्यावरील खड्डे भरणीसाठी कोल्ड मिक्सचा वापर केला जात होता. परंतु पाऊस पडताच बुजवलेले खड्डे उखडत होते. त्यामुळे यंदा पालिकेने खड्डे भरणीसाठी मास्टिक पद्धतीचा वापर सुरू केला असून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.
हेही वाचा >>> उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेला आली जाग; पालिकेने हाती घेतली ‘ही’ मोहिम
खड्डे भरणीसाठी उपयुक्त ठरत असलेल्या मास्टिकचा वापर करण्याचा सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी इतर प्राधिकरणानांना केल्या होत्या. त्यानुसार मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळ या प्राधिकरणानांनी मास्टिक पद्धतीने खड्डे भरणीची कामे सुरू केली आहेत. परिणामी, मागणी वाढल्याने मास्टिकचा तुटवडा जाणवू लागला असून यामुळे खड्डे भरणीची कामे करायची कशी, असा प्रश्न ठाणे पालिकेसह सर्वच यंत्रणा पडला आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीत एमआयडीसीची जलवाहिनी फुटली
ठाणे शहरात गेल्या आठ दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचत होते. यामुळे काही ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत. या रस्त्यांची पावसाची उघडीप मिळताच दुरूस्ती करावी, अशा सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नगर अभियंयांसह उपनगर अभियंत्यांना बैठकीत दिल्या आहेत. मास्टिकच्या साहाय्याने केलेली रस्ते दुरूस्ती ही पावसात देखील टिकून राहते. त्यामुळे मास्टिकचाच वापर करण्यात यावा. यासाठी जलदगतीने मास्टिकचा साठा मोठ्याप्रमाणावर उपलब्ध करुन घ्यावा.
हेही वाचा >>> कल्याण: अपघातानंतर पडघा-खडवली बस सेवा सुरू
प्रभागसमितीनिहाय रस्ते दुरूस्तीचा अहवाल प्राप्त व्हावा यासाठी एका कनिष्ठ अभियंत्यांची नेमणूक करा, जेणेकरुन मास्टिक उपलब्ध करण्यास सोईचे होईल. मास्टिकचा साठा दैनंदिन उपलब्ध होईल, या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. ठाणे शहरात इतर अन्य प्राधिकरणांच्या अखत्यारित देखील काही रस्ते येतात, परंतु नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी या रस्त्याची दुरूस्ती करुन घ्यावी. रस्ते खराब असल्यामुळे नाहक कोणाचा बळी जाणार नाही, या दृष्टीने सर्व कामे युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे, कामे करण्यास दिरंगाई, निष्काळजीपणा, आळसपणा केल्यास चूक माफ केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
मास्टिक तंत्रज्ञान म्हणजे काय?
मास्टिक म्हणजे उच्च प्रतीचे डांबर. या डांबराचे तापमान १८० ते २०० डिग्रीपर्यंत असते. मास्टिकच्या साहाय्याने केलेली रस्ते दुरूस्ती ही पावसात देखील टिकून राहते. तर साधे डांबर हलक्या प्रतीचे असते. त्याचे तापमान १३० डिग्रीपर्यंत असते. त्यामुळे हे पावसात टिकून राहत नाही, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.
मेट्रो प्राधिकरणाला सूचना
ठाणे शहरात मेट्रो प्राधिकरणाच्या कामांमुळे रस्ते खराब होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले असून या पार्श्वभूमीवर आयुक्त बांगर यांनी मेट्रो अधिकाऱ्यांसमेवत बैठक घेतली. रस्तानिहाय आढावा घेवून रस्ते दुरूस्तीच्या सूचना त्यांनी दिल्या. मेट्रो स्टेशनच्या कामामुळे सेवा रस्ते खराब झाले आहेत, त्याची मास्टिक, अस्फाल्टच्या सहाय्याने दुरूस्ती करुन घेण्याच्या सूचना त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ज्या ठिकाणी गटारामधून पाण्याचा निचरा होत नाही, ती गटारे साफ करुन घ्यावीत. अपूर्णावस्थेत असलेल्या गटाराचे बांधकाम पूर्ण केले जावे. माजिवडा येथे व पेपर प्रोडक्ट कंपनी येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर तारा पडलेल्या असून त्या तातडीने उचलल्या जाव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.