महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किशोर कोकणे- पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यातील अनेक औषधे दुकानांमध्ये सॅनिटरी पॅडचा तुटवडा भासू लागला आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे पुरवठादारांच्या सेवांवर परिणाम झाल्याने सॅनिटरी पॅड पुरेशा प्रमाणात मुंबई, ठाण्यातील औषधांच्या दुकानांमध्ये पोहोचत नसल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.

ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच कळवा-मुंब्रा परिसरातील अनेक औषधालयांमध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. टाळेबंदीचा कालावधी ४० हून अधिक वाढल्याने हा तुटवडा अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे, अशी माहिती ठाण्यातील काही औषध विक्रेत्यांनी दिली. प्रत्येक औषध दुकानांत या पॅडचा पुरवठा दर आठवडय़ाला करण्यात येत असतो. टाळेबंदी असल्यामुळे औषधालयात सॅनिटर पॅडचा पुरवठा कमी होऊ लागला आहे. अनेक पुरवठादार कंपन्यांमध्ये अपुरे कर्मचारी असल्याने तसेच वाहतुकीत येणारे अडथळे यांमुळे सॅनिटरी पॅडचा ४० टक्के पुरवठा कमी झाला आहे, अशी माहिती काही औषधालय चालकांनी दिली. महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी दुकानांतील  कर्मचाऱ्यांनाच स्वत: जाऊन पॅड तसेच इतर औषधे आणावी लागत आहे.

मासिक पाळीच्या काळात महिलांना स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सॅनिटरी पॅड वापरावे लागते. मात्र गेल्या काही दिवसांपासून औषधालयामध्ये त्याचा तुटवडा भासत आहे. तर काही ठिकाणी ते उपलब्धही नाही. पॅड उपलब्ध नसल्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांत कपडय़ाचा वापर करावा लागत असल्याचे एका महिलेने सांगितले.

टाळेबंदीमुळे काही पुरवठादार कंपन्यांनी सेवा कमी केल्या आहेत. कर्मचारी नसल्याने ही परिस्थिती आहे. तसेच औषधे तसेच पॅडच्या वाहतूक करणाऱ्या गाडय़ांची संख्याही कमी झालेली आहे. त्यामुळे काही औषधालयांमध्ये पॅड कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तरीही औषधालयातील कर्मचारी स्वत: पुरवठादार कंपन्यांकडे जाऊन पॅड तसेच इतर औषधे आणत आहेत.

– मंजिरी घरत, उपाध्यक्ष, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन.