भगवान मंडलिक, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कल्याण: राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये मागील काही महिन्यांपासून स्मार्ट कार्ड, नवीन चालक परवाना दस्तऐवजांचा तुटवडा निर्माण झाला आहे. स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवान्याशिवाय वाहन चालविणे नियमबाह्य असल्याने हे दस्तऐवज घेण्यासाठी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये वाहन चालक, मालकांच्या फेऱ्या वाढल्या आहेत.

स्मार्ट कार्ड, नोंदणी पुस्तिका (आर. सी. बुक), वाहन चालक परवाना घेण्यासाठी दररोज शेकडो नागरिक आरटीओ कार्यालयांमध्ये फेऱ्या मारत आहेत. या चकरा मारणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारची, वेळकाढू उत्तरे देऊन आरटीओ कार्यालयांमधील कर्मचारी कंटाळले आहेत. मालक आणि कर्मचाऱ्यांच्यामध्ये दररोज खटके उडत आहेत.

हेही वाचा… डोंबिवलीतील खड्डे, कचऱ्यावरुन नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

स्मार्ट सिटी कार्डचा तुटवडा, त्याचा पुरवठा हे विषय परिवहन आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारितील आहेत. वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक आरटीओ अधिकारी या महत्वाच्या विषयावर उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. बहुतांशी नागरिक स्थानिक मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रात जाऊन आपली कामे करतात. मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रांचे चालक ग्राहकाचे स्मार्ट कार्ड, नवीन वाहन परवाना कधी मिळेल म्हणून फेऱ्या मारत आहेत.

हेही वाचा… पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेच्या बिल्डरांना नोटीसा; बिल्डरांवरील कारवाईबाबत मात्र स्पष्टता नाही

मागील पाच महिन्यांपासून स्मार्ट कार्डचे वितरण आरटीओ कार्यालयातून होत नाही, अशी माहिती मोटार प्रशिक्षण केंद्राच्या चालकांनी दिली. ‘स्मार्ट कार्डचा कोऱ्या पुठ्ठ्यांचा पुरवठा करणाऱ्या एका खासगी एजन्सीचे कंत्राट काही दिवसापूर्वी संपले. या एजन्सीचे कामाचे देयक परिवहन विभागाकडून अदा करण्यात आले नाही. या कंपनीकडे राज्यातील आरटीओ कार्यालयांकडून स्मार्ट कार्ड छपाई, नवीन वाहन चालक परवाना वितरणासाठी जी माहिती पाठविण्यात आली आहे. ती माहिती एजन्सी चालकाने कामाचे देयक थकविल्याने छपाई, के. एम. एस. केली नाही. कोऱ्या तुकड्यातील प्लास्टिक पुठ्ठयांचा पुरवठा एजन्सीने हेतुपुरस्सर केला नाही. त्याचा फटका राज्यातील आरटीओ कार्यालयांना बसला आहे,’ अशी माहिती आरटीओ मधील एका विश्वसनीय सुत्राने दिली.

हेही वाचा… बदलापूरः पहिल्याच पावसात विजेचा लपंडाव, मध्यरात्री आणि पहाटेही वीज गायब झाल्याने नागरिक घामाघुम

स्मार्ट कार्ड, नवीन वाहन चालक परवाना हे महत्वाचे विषय आहेत. हे काम करणाऱ्या एजन्सीचे देयक नियमित देणे, त्यांचे कंत्राट संपले असेल तर ते विहित मुदती अगोदर नुतनीकरण करणे किंवा नवीन निविदा मागविणे हे काम परिवहन विभागाचे आहे. ही कामे विहित वेळेत विभागाकडून पूर्ण करण्यात आली नाहीत. त्याचा फटका आरटीओ कार्यालयांना बसला आहे.

सुट्टीचे दिवस असल्याने अनेक कुटुंबीय आपले खासगी वाहन बाहेर काढून पर्यटनासाठी जातात. जवळ स्मार्ट कार्ड नसल्याने अनेक वाहन मालकांची कोंडी झाली आहे. बाहेरच्या प्रांतात वाहन घेऊन गेले तर तेथे स्मार्टकार्ड लागते, असे एका वाहन मालकाने सांगितले. वाहन कागदपत्र सोबत न ठेवता वाहन चालविले तर आता दंडाच्या रकमा दामटुप्पट झाल्या आहेत. हा दंड भरला नाहीतर आरटीओच्या नोटिसा सुरू होतात, असे मालकांनी सांगितले.

“ एका पुरवठादाराकडून कोऱ्या कार्डांचा पुरवठा होण्यास विलंब होत आहे. म्हणून हा प्रश्न निर्माण झाला आहे. तो लवकरच मार्गी लागेल.” – संदेश चव्हाण, संगणक विभाग प्रमुख, परिवहन विभाग, मुंबई.