ठाणे : जालना-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस शनिवारी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकात दाखल होताच, शिवसेना ठाकरे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ढोल आणि ताशांच्या गजरात वंदे भारत एक्स्प्रेसचे स्वागत केले. तसेच पक्षाचे झेंडे उंचावत घोषणाबाजी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे रेल्वे स्थानकात जालना- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. या एक्स्प्रेसमुळे ठाणे शहरात राहणाऱ्या जालनावासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही रेल्वेगाडी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहावर दाखल होणार होती. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यासह काही शिवसैनिक सायंकाळी पाचवाजेपासून ठाणे स्थानकात दाखल झाले होते. त्यानंतर, भाजपचे महिला आणि पुरूष कार्यकर्ते फलाट क्रमांक सहावर दाखल झाले. एक्स्प्रेस ठाणे रेल्वे स्थानकात येण्यापूर्वी खासदार राजन विचारे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह फलाट क्रमांक सहावर आले. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ठाकरे गटानेही शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे यांच्या नावाने घोषणबाजी सुरू केली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचे चित्र होते.

हेही वाचा… ठाणे : वीजेचा धक्का लागून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

हेही वाचा… …आणि हाती झाडू घेऊन मुख्यमंत्र्यांची ठाण्यात रस्ते सफाई

वंदे भारत एक्स्प्रेस स्थानकात दाखल झाल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी मोटारमनच्या केबिनमध्ये शिरून रेल्वे अधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनीही मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश करण्यास सुरूवात केली. मोटरमन केबिनमध्ये गर्दी होऊ लागल्याने अखेर पोलिसांनी मोटरमनच्या केबिनचा दरबाजा बंद केला. काही वेळानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते निघून गेली आणि स्थानकातील गोंगाट कमी झाला.