ठाणे – राज्यात प्रत्येकी २ लाख ३४ हजार नागरिकांमागे केवळ एक रुग्णालय तर आरोग्य विभागात २० हजारहून अधिक पदे रिक्त असल्याचा दावा श्रमजीवी संघटनेने केला आहे. श्रमजीवी संघटनेने काही दिवसांपूर्वी ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांना अचानक भेट दिली. तसेच संपूर्ण राज्याच्या आरोग्य विभागावरील एक अहवाल श्रमजीवी संघटनेने केला आहे. या अहवालात ही बाब समोर आली आहे. याच प्रश्नावर उद्या श्रमजीवी संघटनेने मोठे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठे आंदोलन पुकारले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २४ मे आणि ३१ मे यादिवशी ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय अचानक भेट देत तेथील परिस्थितीची माहिती घेतली. या माहितीचे विश्लेषण करून एक अहवाल श्रमजीवी संघटनेने प्रकाशित केला असून ‘मरण पावलेल्या आरोग्य व्यवस्थेचे पोस्टमार्टेम’ असे शीर्षक या अहवालाला दिले आहे. अहवालाच्या माध्यमातून आरोग्य संस्थांच्या कोलमडलेल्या अवस्थेला सर्वांसमोर आणल्याचा दावा संघटनेने केला.

याच प्रश्नावर उद्या श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठे आंदोलन पुकारले आहे. यात मरण पावलेल्या या आरोग्य व्यवस्थेवर उपचार म्हणून गावागावात भगत, मांत्रिक यांना आरोग्य केंद्राचे प्रमुख घोषित करावे अशी उपरोधिक मागणी करत “भगतांचा पदवीदान सोहळा” म्हणजेच पारंपरिक ‘रवाळ’ (अंगात देव घेऊन जागर करण्याचा कार्यक्रम) ठाण्यात लक्षवेधी ठरणार आहे.या अहवाल पूर्णत्वास समर्थन (अर्थसंकल्प अध्ययन केंद्र) यांनीही हातभार लावला.

अहवालात नेमके काय आहे?

२ लाख ३४ हजार लोकांमागे फक्त १ रुग्णालय?

राज्याची अंदाजित लोकसंख्या १२ कोटी ४ ९ लाख इतकी आहे . राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची संख्या ५०३ आहे . यामध्ये खाटांची संख्या २६,८२३ आहे . राज्याची सरासरी लक्षात घेता २ लाख ३४ हजार ६०१ लोकसंख्येमागे एक रुग्णालय आणि ४ हजार २६४ लोकांमध्ये एक रुग्ण खाट उपलब्ध आहे.

राज्याच्या आरोग्य विभागात २० हजार ५४४ पदे रिक्त

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्ग वगळता उपलब्ध असणारा वर्गनिहाय कर्मचाऱ्यांची ६२ हजार ६३४ पदे मंजूर असताना फक्त ४२ हजार ९ ० पदे भरलेली आहेत . तर २० हजार ५४४ पदे रिक्त आहेत . म्हणजेच आजही मंजूर असलेली ३३ % पदे रिक्त आहेत . राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११ हजार ३५० पदे मंजूर असताना फक्त ९ हजार ३८६ पदे भरली असून १ हजार ९ ५५ पदे रिक्त आहेत .

ठाणे-पालघर-नाशकात ६१ % मनुष्यबळावर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार-

ठाणे पालघर , नाशिक जिल्ह्यातील प्रत्यक्ष पंचनामा केलेल्या ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रिक्त पदांमध्ये आरोग्य सहाय्यक ५३ मंजूर पदांपैकी केवळ ३२ पदे भरलेली असून २१ पदे रिक्त आहेत आरोग्य सहाय्यिका ६५ मंजूर पदांपैकी ५२ पदं भरलेली असून १३ रिक्त आहेत .

आरोग्य सेवकाची २४१ पदं मंजूर असून १५४ पदं भरलेली तर तब्बल ८७ पदं रिक्त आहेत तर आरोग्य सेविकेची मंजूर २ ९ ५ पदांपैकी २१० पदं भरलेली असून ८३ पदं रिक्त आहेत . जीएनएम च्या ४२ मंजूर पदांपैकी ३९ पदं भरलेली असून ३ पदं रिक्त आहेत. औषध निर्माता ४९ मंजूर पदांपैकी ३८ कार्यरत असून ११ पदं रिक्त आहेत . प्रयोग शाळा तंत्रज्ञ मंजूर ५ ९ पदांपैकी ४६ पदं भरलेली असून १३ पदं रिक्त आहेत वाहन चालक मंजूर ५ ९ पदांपैकी २२ पदं भरलेली असून ३७ पदं रिक्त आहेत.

हेही वाचा : रविवारीही शीळफाटा वाहन कोंडीत, काटई ते देसाई पाच मिनिटांच्या अंतरासाठी प्रवाशांची पाऊण तास रखडपट्टी

शिपाई २३० पदं मंजूर असून ८४ पदं भरलेली असून १४७ पदं रिक्त आहेत आणि सफाई कामगारांच्या मंजूर ७५ पदांपैकी ३६ कार्यरत असून ३ ९ पदं रिक्त आहेत . म्हणजेच सर्वेक्षणातील एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहयाक आणि कर्मचार्याच्या ११६८ मंजूर पदांपैकी ७१३ पदं भरलेली असून ४५५ पदं रिक्त आहेत. अर्थात ३ ९ % पदं हि रिक्त असून ६१ % मनुष्यबळावर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार सुरु आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shramajivi organization claim one hospital for every 2 lakh 34 thousand citizens in maharashtra pbs