कल्याण – मुरबाडा तालुक्यातील देवपे गावातील एका तरूणाचे पूर्ववैमनस्यातून हात कापणारा मुरबाड तालुका पंचायत समितीचा माजी सभापती श्रीकांत धुमाळ आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना मुरबाड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. सुनील म्हडसे, निकेश अहिरे यांनाही धुमाळ याच्या सोबत अटक करण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी नितीन धुमाळ, माजी सभापती श्रीकांतचा नातेवाईक अंकुश खारीक यांना अटक केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील पाचही आरोपींना अटक करण्यात मुरबाड पोलिसांना यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवपे गावातील सुशील भोईर (२७) या तरूणाला गेल्या पंधरा दिवसापूर्वी बारवी धरण परिसरातील निर्जन रस्त्यावर गाठून माजी सभापती श्रीकांत धुमाळ याच्यासह त्याच्या चार साथीदारांनी गाठले. सुशील एका रिक्षेतून प्रवास करत होता. सुशीलला रिक्षेतून बाहेर खेचून त्याला बेदम मारहाण करून आरोपींनी सुशीलचे दोन्ही हात पंजापासून कापून टाकले होते. ठेकेदारी, पूर्ववैमनस्य आणि कौटुंबिक वादातून हे प्रकरण घडल्याची चर्चा आहे. या घटनेविषयी राज्यात संतापाची लाट उसळली होती. आता महाराष्ट्राचे पण बिहार होते की काय आणि त्या दिशेने हा प्रवास सुरू आहे की काय, असे प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केले जात होते.

हेही वाचा >>>विवाहासाठी घेतलेल्या लाखो रुपयांच्या साड्या घेऊन चोरटे पसार

श्रीकांत धुमाळ हा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एका वजनदार नेत्याचा खास असल्याचे मानले जाते. त्यामुळे धुमाळवर १५ दिवस अटकेची कारवाई झाली नसल्याचे पीडिताच्या नातेवाईकांकडून सांगितले जाते. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असताना ही घटना घडली होती. या कालावधीत श्रीकांत धुमाळला अटक केली असती तर त्याचे विधीमंडळात पडसाद उमटले असते. या प्रकरणाला राजकीय वळण येऊ नये म्हणून एका बड्या लोकप्रतिनिधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणून हे प्रकरण थोडे हळुवार घेण्याच्या सूचना केल्या असल्याचे समजते.कोणताही दबाव न घेता या प्रकरणाचा तपास आम्ही करत आहोत. या प्रकरणी कोणताही राजकीय दबाव नसल्याचे पोलिसांनी सांगितले.