ठाणे : खारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडा संकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा करण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका प्रशासनाला बुधवारी बैठकीत दिले.ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेंक्शन सेंटर, कोलशेत येथील टाऊन पार्क, कळव्यातील यशवंत रामा साळवी तरण तलावाची नव्याने बांधणी, खारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह आदी प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा बुधवारी घेण्यात आला. या बैठकीसाठी, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, माजी नगरसेवक गोपाळ लांडगे, राम रेपाळे, रमाकांत मढवी, नजीब मुल्ला तसेच जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा