अगं पोरी तू सपनात येना… यांसह विविध गाणी गाऊन अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या बाळ्या रतन दिवे उर्फ बाळ्या सिंगर (३८) याचा मासेमारी करावयास गेला असताना विजेचा झटका लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली. शहापुरजवळ असलेला पळसपाडा येथून वाहणाऱ्या भारंगी नदीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याने गायिलेले गाणे युट्यूबवर एक कोटीहून अधिकजणांनी पाहिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>जागेच्या वादातून एकावर गोळी झाडण्याचा प्रयत्न; एकाला अटक

तालुक्यातील वालशेत येथील खरम्याचा पाडा येथील बाळ्या दिवे हा गुरूवारी सायंकाळ तरुण मासेमारी करण्यासाठी पळस पाडा येथील भारंगी नदीत गेला होता. त्यावेळी बाळ्याला अचानक विजेचा जोरदार झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मासेमारी करून तसेच छोटेखानी कार्यक्रमात विविध गाणी गाऊन तो उदरनिर्वाह करीत होता. अगं पोरी तू सपनात येना… जुन्या जाग्यावर भेट ना… हे गाण युट्यूबवर एक कोटीहून अधिकजणांनी पाहिले आहे. त्यामुळे अल्पावधीतच तो प्रसिद्ध झाला होता. शहापूर पोलीस ठाण्यात त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer balya ratan dive dies due to electric shock amy