कल्याण : कल्याण पूर्व भागात राहत असलेल्या एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या एका तरुणाला आणि त्याला साथ देणाऱ्या बहिणीला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. महिनाभरातील कल्याण पूर्वेतील ही अशाप्रकारची चौथी घटना आहे. कल्याण पूर्वेत अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अजय थापा (२०) आणि सपना थापा (२४) अशी अटक करण्यात आलेल्या बहिण-भावांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, पीडित मुलगी राहत असलेल्या भागात आरोपी अजय, सपना थापा हे बहिण भाऊ राहतात. ही दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखतात. अजयची अनेक दिवसांपासून पीडित मुलीवर नजर होती. शनिवारी ही मुलगी आपल्या घराच्या परिसरात खेळत होती. त्यावेळी अजयने या मुली जवळ जाऊन तिच्या बरोबर अश्लील चाळे करणे सुरू केले. हा प्रकार पाहून पीडित मुलगी भयभीत झाली.

Kashmiri youth arrested for cheating young women with the lure of marriage Pune news
विवाहाच्या आमिषाने तरुणींची फसवणूक करणारा काश्मिरी तरुण गजाआड; दिल्ली, फरिदाबाद, भोपाळ, इंदूरमध्ये फसवणुकीचे गुन्हे
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Crime News
Crime News : HIV पॉझिटिव्ह व्यक्तीकडून १७ वर्षीय मुलीचे अपहरण, १० महिने लैंगिक शोषण; इतके दिवस ‘असा’ राहिला फरार
vasai gangrape marathi news
अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावले, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
rape news kanpur
आधी मद्य पाजलं, मग मित्रांसमोर नाचायला भाग पाडत केला बलात्कार; IIT कानपूरच्या इंजिनिअर महिलेवर अत्याचार
40 year old construction worker arrested for sexually assaulting eight year old boy in Bijlinagar of Chinchwad
पिंपरी : चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार
Crime News
Crime News : TikTok वर व्हिडीओ पोस्ट करण्यावरून पोटच्या १५ वर्षीय मुलीचं ‘ऑनर किलिंग’; US मधून पाकिस्तानात परतल्यानंतर बापाने घातल्या गोळ्या
class 6 girl school raped in Porbandar
शिक्षकाचा सहावीतल्या विद्यार्थीनीवर बलात्कार; वाच्यता केल्यास खिडकीतून फेकण्याची दिली होती धमकी

हेही वाचा : गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत मीटरमधूनच वीज जोडणी घ्यावी, ठाणे महापालिका आयुक्तांच्या गणेशोत्सव मंडळांना सूचना

अजय पीडिते बरोबर अश्लील चाळे करत असताना त्याला रोखण्या ऐवजी त्याची बहिण सपना त्याला साथ देत होती. अजय पीडितेबरोबर जे अश्लील चाळे करत होता याचे मोबाईल चित्रण सपनाने काढले. अल्पवयीन मुलीला हा प्रकार सहन न झाल्याने तिने घरी गेल्यानंतर आपल्या आई, वडिलांना अजयने केलेला घडला प्रकार सांगितला. त्यांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन अजय, सपना थापा यांच्याविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी आरोपी भाऊ, बहिणी विरुध्द विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या आदेशावरुन पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली. आरोपींचे वडिल एका कंपनीत तर आई एका बँकेत मोठ्या पदावर कार्यरत आहे.

Story img Loader