Badlapur School Case : बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. सकाळपासून पालकांनी आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरू केले आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणाच्या चौकशीसाठी आता सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने नेमकं काय म्हटलंय?

बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
ठाणे पोलिसांनी नोंदविला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब; कथित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी वसूली प्रकरण
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून

हेही वाचा – Badlapur School Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आरोपींना…”

पुढे बोलताना, याप्रकरणातील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही ठाणे पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनीही दिली प्रतिक्रिया

या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली असून याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन दिले आहे. पोलीस आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असून त्यावर खुनाचा प्रयत्न, बलात्काराचा प्रयत्न, पोक्सो अशी कठोर कलमे लावण्याचे आदेश दिले आहेत. जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहीजे, असे निर्देश मी दिले आहेत. जेणेकरून पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही. तसेच संस्था चालकांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संस्थाचालकांनी कर्मचाऱ्याला कामाला ठेवण्याआधी त्याची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच नियमावली जाहीर केली जाईल. या प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा – Badlapur School Case : मुलींवरील अत्याचारप्रकरणी हजारो बदलापुरकर रस्त्यावर, पालक आणि नागरिकांचा ठिय्या, बदलापूर बंदची हाक

शाळेबाहेर सकाळपासून आंदोलन

दरम्यान, या घटनेनंतर संतापलेल्या पालकांनी आज सकाळपासून बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले. यादरम्यान, आंदोलकांकडून शाळेची तोडफोडही करण्यात आली आहे. तर रेल्वे स्थानकावर असलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. यामध्ये काही नागरिक तसेच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Story img Loader