शहापूर : शहापूर येथील भागदळ भागात सोमवारी विद्युत तार कोसळून सहा म्हशींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी पांडूरंग भाकरे यांचे नुकसान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भागदळ येथील शेतकरी पांडुरंग भाकरे यांच्या गायी, म्हशी सोमवारी सकाळी रानात चरायला गेल्या होत्या. त्यावेळी अचानक विद्युत वाहक तार पडून सहा म्हशींच्या अंगावर पडली. या घटनेमध्ये म्हशींचा जागीच मृत्यू झाला. या म्हशी दुधदुभत्या होत्या. त्यामुळे पांडुरंग भाकरे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.