कल्याण-डोंबिवली पालिका रुग्णालयात वर्चस्वासाठी रुग्णांच्या जिवाशी खेळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कल्याण-डोंबिवली पालिका रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये वर्चस्वासाठी स्पर्धा लागली आहे. हे वर्चस्वाचे राजकारण आणि रुक्मिणीबाई रुग्णालयातील व्यवस्थापनाविषयी नाराजी व्यक्त करीत सहा डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. पालिका रुग्णालयातील डॉक्टरांमधील हे राजकारण रुग्णांच्या जिवावर उठले आहे, अशी भीती व्यक्त करीत नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी येथील व्यवस्थापिका डॉ. अश्विनी पाटील यांना सेवेतून काढून टाकण्याची मागणी महासभेत केली.

डॉ. पाटील यांची मनमानी वाढली असून त्या समकक्ष पदावरील डॉक्टरांना अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काम करूनही दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याने अनेक डॉक्टर रुग्णसेवा देण्यास नाखूश आहेत. एका डॉक्टरमुळे पालिकेची आरोग्य सेवा विस्कळीत होत असेल तर आयुक्तांनी तातडीने डॉ. अश्विनी पाटील यांना सेवेतून काढून टाकावे, अशी मागणी रमेश म्हात्रे यांनी सभेत केली. डॉक्टरांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीच्या राजकारणामुळे सहा डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. अगोदरच महापालिका रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी आहे. असे असताना वरिष्ठ डॉक्टर नोकरी सोडून जात असतील तर ते रुग्णांच्या दृष्टीने योग्य नाही, असे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयातील अनागोंदी कारभारासंदर्भात नगरसेविका शालिनी वायले यांनी लक्षवेधी मांडली होती. रुक्मिणीबाई रुग्णालयात सहा स्त्रीरोगतज्ज्ञांची गरज आहे. प्रत्यक्षात एक स्त्रीरोगतज्ज्ञ काम करतो. बालरोगतज्ज्ञ एक असून त्यांच्यावर कामाचा भार आहे.

रुग्णालयाच्या जागेत मंडपाचे साहित्य

पालिका रुग्णालयात डॉक्टर भरतीला शासनाने मंजुरी दिली आहे. शासन माध्यमातून ही भरती करायची आहे. खा. डॉ. श्रीकांत शिंदे दोन वर्षांपासून ही भरती करण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्याला दाद दिली जात नाही. रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागाचे खासगीकरण काही डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिस हितसंबंधांमुळे केले जात नाही. पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या जागा घुसखोरांनी काबीज केल्या आहेत. गरिबाचा पाडा येथील रुग्णालय जागेत मंडपवाल्याने सामान भरून ठेवले होते, असे विश्वनाथ राणे यांनी सांगितले.

पालिका रुग्णालयातील डॉक्टर भरती शासनाच्या महापोर्टलमधून करायची आहे. ४५ डॉक्टरांच्या भरतीची माहिती पोर्टलला देण्यात आली आहे. ही भरती लवकरच करण्यात येणार आहे. रेडिऑलॉजीचे खासगीकरण करण्यासाठी तीन निविदांपैकी एक पात्र निविदाधारकाला काम देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.    – गोविंद बोडके, आयुक्त