माणसाला खाण्यानंतरची अतिशय प्रिय किंवा ज्याच्याशिवाय तो जगूच शकणार नाही अशी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे झोप! पण आजही अगणित लोकांना हे सुख सहज साध्य नाही. बिछान्यात तळमळणं, दिवसभरातील घटना आठवत राहणं, शेजारी झोपलेल्याचं घोरणं किंवा झोपेत लाथा मारणं सहन करावं tv13लागणं अशा विविध कारणांमुळे निद्रादेवीची आराधना करण्यात रात्रीचा दिवस होऊन जातो, तरी ती प्रसन्न होऊन कुशीत घेत नाही. मग अनेक समस्या, अस्वास्थ्य याचे दृश्य-अदृश्य परिणाम दिसू लागतात. मधुमेहासारख्या आजारात मधुमेहामुळे झोप कमी होणं आणि झोप कमी झाल्यामुळे मधुमेह वाढणं या दुष्टचक्रात रुग्णाचा जीव अगदी नकोसा होतो. युवा पिढीला तर कॉल सेंटर, सोशल नेटवर्क, व्हॉटसअ‍ॅपच्या थमानानी निद्रानाश आणि निद्राविकार यांच्या दरीत लोटणं सुरू केलं आहे. अपुऱ्या झोपेच्या अभावी मानसिक आणि शारीरिक संतुलन हरवलेल्या तरुणांकडून कोणत्या भव्य-दिव्य स्वप्नांची अपेक्षा आपण करायची?
हे झाले वैयक्तिक झोपेचे परिणाम. याचबरोबर अवेळी झोप लागल्यामुळे असंख्य दुर्घटना जगामध्ये घडलेल्या आहेत. क्षणभर डोळा लागल्यामुळे होणाऱ्या रस्त्यावरील अपघातांची मालिका तर वाढतच जाते आहे. बदलत्या गतिमान जीवनशैलीमुळे सलग झोप मिळणं खरंच दुष्प्राप्य झालं आहे. यासाठी जी काही झोप आपण घेतो ती तरी शांत आणि दर्जेदार आहे की नाही याचा तपास करणं आवश्यक झालंय. यातूनच निर्माण झालं ‘स्लीप सायन्स’ म्हणजे झोपेचं शास्त्र.
नुकतीच ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळ पॉलिटेक्निकमध्ये ‘नेक्स्ट जनरेशन इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयावरील राष्ट्रीय परिषद भरली होती. या परिषदेमध्ये झोपेच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ‘इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर स्लीप सायन्सेस’ या संस्थेच्या डॉ. प्रसाद कर्णिक यांचं एक अतिशय रंजक आणि उपयुक्त भाषण झालं. झोपेचा अभ्यास म्हणजे नॉक्टरनल पॉली सोम्नोग्राफी (ठढरॅ) या विषयाकडे लक्ष देण्यासाठी डॉ. अभिजीत देशपांडे, डॉ. प्राजक्ता देशपांडे, प्रा. संजय देशमुख, लॅब इंडियाचे भालेराव, डॉ. प्रसाद कर्णिक आणि काही जणांनी एकत्र येऊन २०१० साली ‘इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर स्लीप सायन्सेस’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमध्ये आपल्या झोपेविषयी तक्रार असणाऱ्या किंवा माहिती जाणून घ्यायची इच्छा असणाऱ्या व्यक्तिच्या झोपेचा सखोल अभ्यास केला जातो. झोपेच्या या निदान आणि उपचार पद्धतीत, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा अतिशय कल्पक वापर करून घेतला जातो आहे. यासाठी झोपेची तक्रार असलेल्या व्यक्तीच्या शरीरावर अनेक छोटे छोटे इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर बसविले जातात. या सेन्सरमार्फत व्यक्तीच्या मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या लहरी (ईईजी), हृदयाच्या ठोक्यांचे आलेख (ईसीजी), बुबुळांची हालचाल, छाती आणि पोटाची हालचाल, पायाची हालचाल, दात खाण्याची सवय, घोरण्याचा आवाज, श्वासोच्छ्वासमाधील ऑक्सिजनचे प्रमाण अशा १५ ते २० गोष्टींची अचूक नोंद घेतली जाते.
झोपेच्या या शास्त्रात अनेक अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर्सबरोबर लोरेटा, हार्टमॅथ अशा सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. झोप लागण्याच्या प्रक्रियेतील सर्व हालचालींचे आलेख एका मॉनिटरवरून एकत्र पाहिले जातात. या आलेखांच्या अभ्यासावरून, रुग्णाची झोप बिघडण्याचं कारण शारीरिक आहे की मानसिक हे सोम्नोलॉजिस्ट म्हणजे झोपशास्त्राचे तंत्रज्ञ जाणून घेतात. त्यानुसार झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वैद्यकीय मदत घ्यावी की मानसशास्त्राची याची दिशा ठरवली जाते. या संस्थेमध्ये कोणतेही औषधोपचार दिले जात नाहीत तर फक्त निदान केलं जातं. जर एखादी विशेष केस असेल तर आधुनिक व्हिडीओ कॉन्फरन्स तंत्र वापरून अमेरिकेतून डॉ. अभिजीत देशपांडे आणि भारतातून डॉ. प्रसाद कर्णिक त्या व्यक्तीसमवेत चर्चा करून उपचाराची योग्य दिशा ठरवतात. त्यानुसार पुढील उपचारासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अथवा मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचे सुचवले जाते.
या बरोबरच घोरण्यासारख्या काही विशिष्ट तक्रारीसाठी पॉझिटिव्ह एअर प्रेशर थेरपी (पॅप) हा विशेष उपचार एका लांब नळीत हवा भरण्याच्या कृतीतून शिकवला जातो. स्वत: डॉ. कर्णिक ३५ वष्रे योगाभ्यास आणि घंटाळी मित्र मंडळात योगशिक्षक म्हणून कार्यरत असल्यामुळे उज्जायी, दीर्घश्वसन, ओंकार असे सुयोग्य उपचार त्या व्यक्तीला सुचवितात. आजच्या घडीला झोपेच्या शास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी कॉलेज ऑफ मेडिसिन, शिकागो येथे स्लीप सेंटर तर युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर स्लीप सायन्स असे स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. डिस्टन्स एज्युकेशन अभ्यासक्रमात या विषयावरचे शिक्षण घेता येत आहे. या सर्व यादीत भारतातील इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर स्लीप सायन्सेस याचा समावेश आहे. या संस्थेमध्ये मदतनीस म्हणून आदिवासी तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. आजच्या घडीला चार तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी या आलेखातून मिळालेल्या माहितीवर मुंबई युनिव्हर्सिटीमधून झोपेच्या शास्त्रावर पीएच.डी. करीत आहेत.
आपल्या सर्वाच्या जिव्हाळ्याचा झोप हा विषय अशा प्रकारे विज्ञानाच्या साहाय्याने हाताळला जातो आहे. आपल्या झोपेची कोणी तरी एवढी काळजी घेतंय ही गोष्ट आपल्याला नक्कीच सुखावणारी आहे नाही का? तर मग.. टेन्शन खल्लास.. झोपूया आनंदे!

-प्रा. कीर्ती आगाशे

मंडईचा मसावि
कोंबडीचे दर (किलोमध्ये)
ब्रॉयलर – ११० रु.
गावठी – २०० रु.
अंडी (१ नग)- ४ रु.
tv17
काय, कुठे, कसं?
घराची नोंदणी
*बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील घराच्या कराराची ‘भारतीय नोंदणी कायदा’अन्वये नोंदणी करणे आवश्यक आहे.
*नोंदणी न केल्यास या घराची कायदेशीर मालकी तुमच्याकडे येत नाही. मालमत्तेचे व्यवहार करण्यात अडथळे येतात.
*नोंदणी करण्यापूर्वी मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.
*नोंदणीवेळी विक्रीकरार, मालमत्तेच्या कराबाबतची कागदपत्रे, हाउसिंग सोसायटीकडून ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, तर घर विकत घेणाऱ्याकडून खरेदी करार, ओळखीचा व पत्त्याचा पुरावा, पॅनकार्डची प्रत, दोन साक्षीदारांची स्वाक्षरी आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
येथे नोंदणी करावी
*ठाणे : सह उपनिबंधक, महिला मंडळ बिल्डिंग, तलावपाळी, ठाणे (प.)
*कल्याण : सह उपनिबंधक, कर्वे इमारत, होलीक्रॉस शाळेजवळ, चिकणघर, कल्याण (प.)
*डोंबिवली : सह उपनिबंधक, तर्टे प्लाझा, गांधी नगर, सुभाष डेअरीजवळ, डोंबिवली (पूर्व)
*कल्याण ग्रामीण : सह उपनिबंधक, गोमुख इमारत, लोढा हेवन, निळजे.
बदलापूर : सह उपनिबंधक, बिपिन अपार्टमेंट, कात्रप गाव, बदलापूर (पूर्व)
*अंबरनाथ : सह उपनिबंधक, नवीन प्रशासकीय इमारत, तहसीलदार कार्यालय, रेल्वे स्थानकाजवळ, अंबरनाथ (प.)

Story img Loader