बदलापुरातील कात्रप भागात एका दुकानासमोरील भाग कोसळून तेथे असलेली टपरी खाली असलेल्या गटारात पडली. ८ ते १० फूट खोल गटारात ही टपरी पडली असून सुदैवाने यावेळी टपरीत चालक व ग्राहक नसल्याने मोठी दुर्घटना झाली नाही. परंतु, या घटनेमुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न व निकृष्ट बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
स्पंदन रुग्णालयालगत असलेल्या गणेश कृपा या इमारतीत बुधवारी रात्री हा प्रकार घडला. या इमारतीत तळमजल्यावर दुकानांचे पाच ते सहा गाळे आहेत. ही इमारत १५ ते २० वष्रे जुनी आहे. या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून पालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.
इमारतीचा भाग कोसळून टपरी गटारात
बदलापुरातील कात्रप भागात एका दुकानासमोरील भाग कोसळून तेथे असलेली टपरी खाली असलेल्या गटारात पडली.

First published on: 20-06-2015 at 11:23 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small shop collapse in badlapur