मुंबईच्या पलीकडे फोफावत चाललेल्या नागरीकरणाची केंद्रे असलेल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांतील बातम्यांचा वेध घेणारे ‘लोकसत्ता ठाणे’ हे सहवृत्तपत्र १५ जानेवारी २०१५पासून सुरू करण्यात आले. नागरीकरणाच्या आड येणाऱ्या अडचणी, नागरीकरण होताना निर्माण होणारे प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा यांना वाचा फोडण्याचे तत्त्व या सहवृत्तपत्राने सुरुवातीपासूनच पाळले आहे. त्यामुळेच येत्या १५ जानेवारीला होत असलेल्या ‘लोकसत्ता ठाणे’च्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने नागरी प्रश्नांशी निगडित मुद्दय़ांना हात घालणारा ‘लोकसत्ता लोकसंवाद’ हा उपक्रम आजपासून सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पर्यावरण, प्रदूषण, वाहतूक, परिवहन, रस्ते, रेल्वे, स्वच्छता, पाणीपुरवठा, कायदा व सुव्यवस्था अशा मुद्दय़ांवर त्या त्या क्षेत्रातील जाणकार-तज्ज्ञ आपली भूमिका दररोज मांडणार आहेत. तर जाणकारांनी मांडलेल्या प्रश्नांवर महापालिका/जिल्हाधिकारी/ पोलीस या प्रशासकीय यंत्रणांमधील जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका वर्धापन दिनाच्या (१५ जानेवारी) अंकात प्रसिद्ध करण्यात येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा