कल्याण – शहापूर, मुरबाड तालुक्यातील भटक्या गाईंना रात्रीच्या वेळेत गुंगीचे इंजेक्शन मारून त्यांना बेशुद्ध करायचे. त्या गाईंना मोटारीच्या सामान ठेवण्याच्या जागेत कोंबून त्यांना कल्याणमध्ये पत्रीपूल रेतीबंदर भागात आणून त्यांची हत्या करायची. ते गोमांस काळ्या बाजारात विकायचे. असा धंदा करणाऱ्या पाचजणांचा बाजारपेठ पोलीस शोध घेत आहेत. एका तस्कराला पकडण्यात पोलिसांना यश आले.
घटनास्थळावरून पोलिसांनी ५० हजार रुपये किमतीचे गोमांस, दोन जिवंत गाई, दोन मोटारी, रिक्षा असा एकूण दोन लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तस्करांच्या तावडीतून पोलिसांनी दोन गाईंची सुटका केली. अनेक वर्षे हा प्रकार कल्याण, शहापूर, मुरबाड परिसरात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांची गाई, बैल या तस्करांनी रात्रीच्या वेळेत चोरून नेऊन त्यांची कत्तलखान्यात विल्हेवाट लावली आहे.
हेही वाचा – डोंबिवलीत तरुणावर चाकूने हल्ला
कल्याण पश्चिमेतील बैलबाजारातील रेतीबंदर खाडी किनारी जीन्स कारखान्याजवळ सार्वजनिक ठिकाणी दोन गाईंना मोटारीतून आणून त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण घोलप यांना रात्रीच्या वेळेत मिळाली. घोलप यांच्या समवेत हवालदार साळवी, बागूल, बाविस्कर, पावशे, फड यांचे पथक रेतीबंदर खाडी किनारी पोहोचले. गोविंदवाडी रस्त्यावरील सर्वोदय सागर इमारतीजवळ मोटारीजवळ संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या सोयब निजाम करके (३२, रा. खैरणे गाव, जामा मशिद जवळ, नवी मुंबई) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोयबला पोलिसांनी पकडल्याचे समजताच बाजुलाच गाईंजवळ उभे असलेले इब्राहिम इस्माईल मजीद उर्फ पापा हड्डी (रा.बाजारपेठ, कल्याण), अरबाज गोरू (रा. बाजारपेठ), मच्छी आवली, बारक्या (सर्व राहणार बाजारपेठ, कल्याण) असे पाचजण घटनास्थळावरून पळून गेले.
हेही वाचा – कल्याणमध्ये आधारवाडीत सफाई कामगारांच्या हजेरी निवाऱ्यात भाजीपाल्याचे बेकायदा दुकान
पोलिसांनी मोटारीतून बेशुद्ध करून आणलेल्या दोन गाईंची सुटका केली. पोलिसांनी दोन मोटार कार, एक रिक्षा, तलवार, सुरे जप्त केले. घटनास्थळी २५० किलो गोमांस पडले होते. गाईंची हत्या करून गोमांस काळ्या बाजारात २०० रुपये प्रति किलो दराने विक्री करण्याचा आरोपींचा धंदा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याने आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.