ठाणे – दिवाळी सणाला अवघे काही दिवस बाकी असून गृहिणींची फराळ तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदा फराळ्याच्या साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विशेषत: सुकामेव्याचे दर वधारले आहेत. तर तेल, तूप, साखर, गूळ, रवा, खोबरे यांच्या दरातही १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दिवाळी सणाचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. सणानिमित्त बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पणत्या, कंदील, रांगोळ्या, विद्युत रोषणाईने बाजार सजले आहे. त्याचप्रमाणे फराळाचे साहित्य खरेदीलाही नागरिकांची लगबग सुरू आहे. यंदा फराळ तयार करणाऱ्यांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सुका मेव्याच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. काजू घाऊक बाजारात ८९५ रुपये किलो दराने विक्री होत असून किरकोळात काजूचे दर ११०० रुपये इतके आहेत. चारोळी १०२५ रुपये किलो दराने विक्री होत असून किरकोळात याचे दर २५०० रुपये किलो आहेत. वेलची १८०० रुपये किलो दराने विक्री होत असून किरकोळात याचे दर ३००० रुपये आहेत. खजूर घाऊक बाजारात १५० रुपये किलो दराने आहे तर किरकोळ बाजारात २०० रुपयांस विक्री होत आहे. पिस्ता घाऊक बाजारात १०९० रुपये किलो दराने आहे तर किरकोळ बाजारात पिस्त्याचे दर अधिक वाढले आहेत. किरकोळ बाजारात पिस्ता १८०० रुपये किलोने विक्री होत आहे. त्याचबरोबर खारीक घाऊक बाजारात १९० रुपये किलोने विक्री होत आहे. तर किरकोळ बाजारात ३०० रुपये किलोने मिळत आहे. मनुके घाऊक बाजारात २०० रुपये किलोने मिळत आहे तर किरकोळ बाजारात ३०० रुपये किलोने विक्री होत आहे. सुका मेव्याबरोबरच फराळाचे साहित्य देखिल महागले आहे. तेल, खोबऱ्यासह डाळींच्या दरात देखील वाढ झाली आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

हेही वाचा – ठाणे पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सानुग्रह अनुदानापाठोपाठ वेतन दिवळीआधी जमा होणार

सध्या दिवाळीमध्ये मिठाईपेक्षा सुक्या मेव्याला नागरिकांकडून अधिक पसंती दिली जात आहे. कार्यालय किंवा खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भेट म्हणून सुका मेवा दिला जातो. यासाठी दुकानांमध्ये दिवाळीपूर्वी सुक्या मेव्यांचे विविध रंगांमध्ये पेट्या तयार केल्या जातात. या पेट्या ५०० रुपयांपासून मिळत आहेत.

हेही वाचा – ठाणे पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सानुग्रह अनुदानापाठोपाठ वेतन दिवळीआधी जमा होणार

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळ साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. साहित्याच्या दरात वाढ झाली असली तरी महिलांचा साहित्य खरेदीकडे कल आहे.- जीवन पटेल, किरकोळ साहित्य विक्रेते

सुका मेवा दर (प्रतिकिलो)

घाऊक – किरकोळ – आधीचे

काजू – ८९५ – ११०० – ८००
बदाम – ८५० – ८५० – ७००

चारोळे – १०२५ – २५०० – १८००
वेलची – १८०० – ३००० – १६००

खजूर – १५० – २०० – १००
खारीक – १९० – ३०० – २७०

मनुके – २०० – ३०० – २५०
पिस्ता – १०९० – १८०० – ११००

फराळ साहित्य दर (प्रतिकिलो)

आताचे – आधीचे

तेल – २२०० (एक डबा) – १६०० (एक डबा)

चणा डाळ – १०० – ७०
रवा – ५० – ४०

बेसन – ११० – ८०
तीळ – ३०० – १००

मैदा – ५० – ४०
खोबरे – २६० – १२०

तुप – ६७० – ५५०
धणे – २६० – १४०

शेंगदाणे – १४० – १००