लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवलीजवळील निळजे गावातील जमीन मालक व्यक्ती मयत झाली आहे हे माहिती असुनही निळजे गावातील दोन ग्रामस्थांनी त्या मयत व्यक्तीच्या नावाने बनावट सात बारा, फेरफार तयार केले. त्या आधारे बनावट दस्त नोंदणी करून मयत व्यक्तीची जमीन आपल्या मालकीची असल्याचे दाखवून त्या जमिनीमधून गेलेल्या विकास योजनेतील रस्त्याच्या भरपाईची ११ कोटीची रक्कम बेमालुपणे लाटली आहे.

Cash worth Rs 16 lakh found in house of corrupt employee of Kalyan Dombivali Municipality
कल्याण डोंबिवली पालिकेतील लाचखोर कर्मचाऱ्याच्या घरात सापडली १६ लाखाची रोकड
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
‘एमपीएससी’ प्रश्नपत्रिकेचे आमिष प्रकरणी नागपूरमधून आणखी दोघे अटकेत
Former corporator Swapnil bandekar and four arrested
बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १० कोटींची खंडणी
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
Two burglars arrested in Madhya Pradesh news in marathi
घरफोडया करणाऱ्या दोघांना मध्‍यप्रदेशात केले जेरबंद; चार गुन्‍हयांची कबुली, साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत
debt collectors false case news in marathi
जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेड्या
ग्रामीण भागात घरफोडी करणारा चोरटा गजाआड; चोरट्याकडून १६ लाखांचा ऐवज जप्त

गेल्या महिन्यात घडलेला हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार आता उघड झाल्याने मयताच्या नातेवाईकाने या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणाने २७ गावात खळबळ उडाली आहे. या फसवणूक प्रकरणात मयत व्यक्तीचे नातेवाईक निळजे गावातील रहिवासी सुरेश आंबो खुटारकर (६७) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. उत्तम गणा पाटील, सुदर्शन रोहिदास पाटील अशी आरोपींची नावे आहेत. ते निळजे गावातील रहिवासी आहेत.

आणखी वाचा-ठाणे : मजुरीचे पैसे दिले नाही म्हणून मालकाची चाकू भोसकून हत्या

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार सुरेश आंबो खुटारकर यांचे वडील आंबो पांडू खुटारकर हे २०११ मध्ये मयत झाले आहेत. आंबो खुटारकर यांची निळजे गावाजवळ हेदुटणे रस्त्यावर ३० गुंठे वडिलोपार्जित जमीन आहे. ही जमीन रस्ते विकास योजनेने बाधित झाली आहे. या जमिनीचा शासनाकडून ११ कोटीचा मोबादला मिळणार होता. या जमिनीचे वारस सुरेश खुटारकर आहेत. या जमिनीचा शासनाकडून मोबदला मिळणार असल्याने निळजे गावातील ग्रामस्थ आरोपी उ्तम पाटील, रोहिदास पाटील यांनी तक्रारदार सुरेश खुटारकर यांना काहीही कळणार नाही अशा पध्दतीने त्यांच्या वडिलांच्या नावे जमीन विक्रीचा व्यवहार करणारी बनावट कागदपत्रे तयार केली. यामध्ये तहसीलदार कल्याण, शेत जमीन न्यायधिकरण हे लिहून देणार आणि मयत आंबो खुटारकर हे लिहून घेणार असा बनावट दस्तऐवज गेल्या महिन्यात तयार करण्यात आला.

आणखी वाचा-ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन सुरूच

आंबो खुटारकर हे १४ वर्षापूर्वी मयत झाले असताना त्यांच्या नावे गेल्या महिन्यात ते हयात असल्याचे दाखवून आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केली. ही जमीन खरेदी विक्रीची कागदपत्रे कल्याणच्या दस्त नोंदणी कार्यालयात दाखल करून ती नोंदणीकृत करून घेतली. आंबो खुटारकर हयात नाहीत हे माहिती असुनही आरोपींनी त्यांच्याकडून आपण जमीन खरेदी केली आहे असे दाखवून त्या जमिनीच्या सातबारा, फेरफारवर स्वताची नावे चढवली. ही कागदपत्रे आंबो यांच्या जमिनीला शासकीय मोबदला मिळणार होता, त्या महसूल कार्यालयाकडे दाखल केली. या जमिनीचे मूळ वारस सुरेश खुटारकर यांना काहीही कळून न देता खुटारकर यांच्या जमिनीतून रस्ते भरपाईसाठी मिळणारा ११ कोटीचा मोबदला परस्पर काढून घेतला.

सुरेश यांना आपल्या जमिनीतून शासकीय रस्ता सुरू असताना आपणास मोबदला का मिळाली नाही म्हणून त्यांनी महसूल कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी हा फसवणुकीचा प्रकार उघडकीला आला. सुरेश यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. असाच प्रकार यापूर्वी निळजे गाव, भिवंडी भागात घडले आहेत.

Story img Loader