भाईंदर : करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १७ मेपर्यंत राज्यात ताळेबंदी नियम वाढवण्यात आला आहे; परंतु मीरा-भाईंदर शहरांतील नागरिक प्रशासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून बाजारात मोठय़ा प्रमाणात गर्दी करत असल्याचे आढळून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मीरा-भाईंदर शहरांत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यामुळे स्थानीय स्वराज्य संस्थेकडून शहरात गर्दी कमी होण्याकरिता अनेक कडक पावले उचलण्यात येत आहे. यात गेले काही दिवस बंद ठेवण्यात आलेली किराणा दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे; परंतु त्यानंतरदेखील अनेक नागरिक सामाजिक अंतर न ठेवताच वावरत असल्याचे आढळून येत आहे.

मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णाची संख्या दोनशेजवळ आली असून आतापर्यंत पाच रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इतकी भयानक परिस्थिती असतानादेखील नागरिक अत्यावश्यक कामाला वगळून घराबाहेर निघत आहेत. यात प्रामुख्याने सिगारेट आणि दारूच्या शोधात निघणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करत आहेत. त्याकरिता ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला आहे. तरीदेखील नागरिक घराबाहेर पडून गर्दी करत आहेत. यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.