ठाणे: मुंब्रा येथील स्थानक परिसराजवळ दोघांमधील वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सोहेल मोमीन यांना सुऱ्याने भोसकण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. सोहेल यांच्यावर मुंबईतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी फैय्याज शेख याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंब्रा स्थानक परिसरात रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अफान सय्यद आणि फैय्याज शेख यांच्यामध्ये वाद सुरू होते. त्याचवेळी सोहेल मोमीन हे त्यांच्या मित्रोसोबत परिसरातून पायी जात होते. वाद सोडविण्यासाठी सोहेल हे तात्काळ त्याठिकाणी गेले. त्यावेळी फैय्याज याने त्याच्या हातातील सुरा सोहेल यांच्या पोटात भोसकला. तसेच गालावर, पोटावर सुऱ्याने हल्ला केला.

हेही वाचा… ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या आणि बढत्या

सोहेल गंभीर जखमी झाल्यानंतर फैय्याज याने तेथून पळ काढला. या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सोहेल यांच्यावर मुंबईतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फैय्याजचा शोध सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sohail momin was stabbed with a knife when he went to resolve the dispute near mumbra dvr