लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील काँक्रीट रस्ते कामांमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भुयारी मलवाहिन्या, रस्त्या लगतची गटारे नादुरूस्त झाली आहेत. भुयारी गटारांमध्ये पाच ते सात फूट खोल मातीचे भराव पडले आहेत. अनेक ठिकाणी गटारे तुंबली आहेत. काही ठिकाणी भूमिगत मलवाहिन्या खराब झाल्या आहेत, असे पत्र डोंबिवली एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांनी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अर्जुन कोरगावकर यांना पाठविले आहे.

raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही
butibori flyover latest marathi news
गडकरींच्या जिल्ह्यातील उड्डाण पूल खचला, एक किमी वाहनांच्या रांगा
Mumbai contraction again started digging newly constructed cement concrete road in Lokhandwala area of ​​Andheri West
अंधेरीत नव्याने केलेल्या रस्त्यावर पुन्हा खोदकाम, पहिल्या टप्प्यातील रस्ते कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी रस्त्यांची कामे पुन्हा करण्याची वेळ

एमआयडीसी निवासी, औद्योगिक विभागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) च्या माध्यमातून ११० कोटीची काँक्रीटीची रस्ते कामे करण्यात आली आहेत. काही कामे सुरू आहेत.

आणखी वाचा-ठाकुर्ली-चोळे गावातील रस्ता वाहतुकीसाठी १५ दिवस बंद

काँक्रीट रस्त्यालगतची भूमिगत खराब झालेल्या मलवाहिन्या बदलणे, भुयारी गटारांमधील माती काढण्याची कामे करण्यासाठी एमआयडीसीने एक ठेकेदार नियुक्त केला आहे. एमआयडीसीची कामे सुरू होण्यापूर्वीच ‘एमएमआरडीए’ने रस्ता सीमारेषा लगतची मलवाहिन्या, गटारे असलेली मोकळी जागा पेव्हर ब्लॉक लावून बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भुयारी अंतर्गत कामे करण्यापूर्वीच पेव्हर ब्लॉक लावले तर मोठी समस्या निर्माण होईल. पेव्हर ब्लॉक काढून भुयारी मलवाहिन्या दुरुस्तीची कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे केलेले काम फुकट जाईल, असे एमआयडीसी प्रशासनाने एमएमआरडीएला कळविले आहे.

पेव्हर ब्लाॅक बसविण्याचा निर्णय कायम असेल तर गटार, भुयारी मलवाहिन्यांच्या भागात, काँक्रीट रस्त्याच्या सीमारेषेपासून काही अंतर पेव्हर ब्लॉक बसू नयेत, अशी सूचना एमआयडीसीने ‘एमएमआरडीए’ प्रशासनाला केली आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत एमआयडीसीत काँक्रीट रस्ते कामे करताना ‘एमएमआरडीए’च्या ठेकेदाराने खोदकाम करताना एमआयडीसीच्या अनेक वेळा जलवाहिन्या फोडल्या. गटारांची तोडफोड केल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यांवर आले. या सर्व गोष्टींचा एमआयडीसी अधिकाऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागला. स्थानिक पातळीवर उद्योग, निवासी विभागाला नागरी सुविधा देण्याची जबाबदारी एमआयडीसीची असल्याने आम्ही याविषयी कधी एमएमआरडीएला विचारणा केली नाही, असेही एमआयडीसी अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा-मुंबई नाशिक महामार्ग खड्डेमुक्तीच्या मार्गावर, पावसाळ्यापर्यत काम पुर्ण करण्याच्या सूचना

‘एमआयडीसी’तील रस्ते नियंत्रक संस्था ‘एमआयडीसी’ असताना या संस्थेला विचारात न घेता ‘एमएमआरडीए’ने आता काँक्रीट रस्त्यांच्या बाजुला भूमिगत मलवाहिन्या, मातीनी भरलेली गटारे यांचा विचार न करता पेव्हर ब्लॉक परस्पर लावण्यास सुरूवात केल्याने भूमिगत मलवाहिन्यांमध्ये काही समस्या झाल्यास त्या दुरुस्त कशा करायच्या, असा प्रश्न एमआयडीसी अधिकाऱ्यांसमोर आहे. अधिक माहितीसाठी ‘एमएमआरडीए’चे कार्यकारी अभियंता अर्जुन कोरगावकर यांना संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

“ काँक्रीट रस्त्यांच्या लगत भूमिगत मलवाहिन्या असल्याने रस्ते आणि गटार यांच्या मधील भागात मोकळी जागा ठेऊन मग पेव्हर ब्लॉक बसवावेत, अशी सूचना एमएमआरडीएला केली आहे.” -शंकर आव्हड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी.

Story img Loader