स्वच्छ भारत अभियान (ग्रामिण) टप्पा दोनच्या अतंर्गत केंद्र आणि राज्य स्तरावरुन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून याच पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनी पुढाकार घेवुन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून खत निर्मिती, भंगार विक्री यांसारखे अर्थार्जन करून देणारे उपक्रमही राबविले जात आहे. या प्रकल्पाची नुकतीच ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी पाहणी करत प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहरालगत असणाऱ्या काल्हेर ग्रामपंचायतीत दाट लोकवस्ती असल्याने कचरा व्यवस्थापनाची मोठी समस्या होती. या समस्येवर मात करण्यासाठी आणि काल्हेर परिसर कचरामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व सदस्यांनी पुढाकार घेऊन स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) टप्पा दोन आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने घनकचरा प्रकल्प उभा करण्याचे काम हाती घेतले. या प्रकल्पासाठी योग्य जागेची निवड करत आठ महिन्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला.

डोंबिवलीत बेकायदा इमारतींचा पाणीपुरवठा खंडित; पाण्याची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

या प्रकल्पात ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कच-यापासून खत निर्मिती करण्यात येते. तर सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातील भंगार बाजारात विकण्यात येत आहे. यातून ग्रामपंचायतीचे उत्तम अर्थार्जन देखील होत आहे. या प्रकल्पाची नुकतीच ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील यांच्यसह इतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील व उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी प्रकल्प दररोज कार्यान्वित ठेवून घनकच-याचे योग्य व्यवस्थापन करण्यांबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला सुचना दिल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solid waste management project in kalher in thane tmb 01