मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील कोपरी परिसरात महापालिकेने केलेली काही विकासकामे दर्जाहिन तसेच त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी विधानसभेत केली. विकासकामांमध्ये झालेल्या कथीत गैरव्यहाराचे आरोप आमदार केळकर यांनी केल्याने शिंदे गोटात अस्वस्थता पसरली आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीत रिक्षा चालकाला ठार मारण्याच्या आरोपातून नाडर टोळीची निर्दोष मुक्तता
ठाणे महापालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व राहीले आहे. गेल्यावर्षी महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपल्याने प्रशासकीय राजवट लागू झाली. याच काळात शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने त्यांचे ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. असे असतानाच, ठाणे महापालिकेतील कथीत गैरकारभाराचा मुद्दा सातत्याने लावून धरत शिंदे समर्थकांनाच अप्रत्यक्षपणे अडचणीत आणणारे भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील विकासकामांवर बोट ठेवत मंगळवारी पुन्हा एकदा या प्रकरणी चौकशीची मागणी केली. कोपरी परिसरात जाॅगिंग ट्रकसाठी ९८ लाख, पदपथ सुधारणा प्रकल्पालासाठी ५ कोटी ४४ लाख आणि इतर अनेक कामांसाठी ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>डोंबिवलीतील रिजन्सी अनंतम गृहसंकुलात ओला, उबर चालकांना अघोषित बंदी?स्थानिक रिक्षा चालकांच्या दादागिरीने रहिवासी हैराण
पण, यातील अनेक कामे अर्धवट आणि दर्जाहीन असतानाही कंत्राटदारांना देयके अदा करण्यात आली आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री ठाण्याच्या विकासासाठी भरपूर निधी आणत आहेत, मात्र विकासाच्या नावाखाली ठराविक ठेकेदार आणि अधिकारी या निधीची लूट करत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.