कल्याण- मे अखेरपर्यंत जी खड्डे भरण्याची कामे पालिका शहर अभियंता विभागाने पूर्ण करणे आवश्यक होते ती कामे दोन महिने उशिरा म्हणजे जुलै महिन्यात सुरू केल्याने डोंबिवली, कल्याणमधील शहरांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. रिक्षा चालक, नागरिक खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाने रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. प्रशासनावर होणारा टिकेचा भडीमार रोखण्यासाठी बांधकाम विभागाने रात्रपाळीत सिमेंट काँक्रीटच्या गिलाव्याने (रेडिमिक्स) खड्डे भरणीच्या कामास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काँक्रीटचा गिलावा टाकल्यानंतर किमान अर्धा ते एक तास वाहतूक बंद ठेवणे आवश्यक असल्याने अभियंते रात्री ११ वाजल्यानंतर खड्डे भरणीची कामे सुरू करतात. यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस, वाहतूक सेवक, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी पालिकेला खड्डे भरणीच्या कामासाठी मदत करतात. लवकरात लवकर खड्डे भरणी करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी वाहतूक, पोलीस, नागरिकांकडून पालिकेकडून केली जात आहे.

डोंबिवली पश्चिमेत रात्री साडे अकरा वाजता महात्मा फुले रस्ता, गरीबाचापाडा, जुनी डोंबिवली भागातील खड्डे भरणीची कामे काँक्रीट गिलाव्याने करण्यात आली. यावेळी ह प्रभाग बांधकाम विभागाचे साहाय्यक अभियंता महेश गुप्ते उपस्थित होते. रात्री साडे अकरा वाजता सुरू केलेले काम पहाटे चार वाजता संपविण्यात आली. काँक्रीट गिलाव्याने खड्डे भरणीचे काम शास्त्रोक्त पध्दतीने आणि पाच मिनिटा पूर्ण होत असल्याने पालिकेने दरवर्षी अशाच पध्दतीने मे अखेरपर्यंत खड्डे भरणीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

रात्री गिलावा खड्डयांमध्ये टाकल्यावर त्यावर पावसाने काँक्रीट वाहून जाऊ नये म्हणून प्लास्टिकची पथारी पसरण्यात येत होती. तरीही मुसळधार सर आल्यानंतर टाकलेले काँक्रीट वाहून जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. खड्डे भरणीची कामे सुरू असताना अनेक वाहन चालक अधिकाऱ्यांना न जुमानता काँक्रीट गिलावा टाकलेल्या रस्त्यावरून वाहने नेत असल्याने खड्डे भरणीची नासधूस होत आहे. डोंबिवली पश्चिमेत खाडी किनारा भागातून रात्री एक ते पहाट पाच वाजेपर्यंत चोरीची वाळू घेऊन काही भूमाफिया भिवंडी, डोंबिवली, कल्याण परिसरात इमारत बांधकामाच्या ठिकाणी वाळू टाकण्यासाठी जातात. या वजनदार वाळुच्या ट्रकने सोमवारी रात्री बुजविलेले खड्डे उखडून टाकले आहेत, अशा तक्रार पालिकेकडे आल्या आहेत.

डोंबिवली पश्चिमेत ह प्रभागात जशी रात्रीच्या वेळेत खड्डे भरणीची कामे सुरू करण्यात आली आहेत तशीच कामे इतर प्रभाग हद्दीत रात्रीच्या वेळेत करून अभियंत्यांनी नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी टिटवाळा, कल्याण, २७ गाव भागातील नागरिकांनी केली आहे. शहर अभियंता विभागातील मरगळ झटकण्यासाठी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी या विभागाच्या अंतर्गत लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शहर अभियंता विभागाच्या निष्क्रिय कामकाज पध्दतीमुळे कल्याण डोंबिवली शहरात खड्डे पडले आहेत.

पालिकेचे आवाहन

खड्डे भरणीची कामे सुरू असताना अर्धा ते एक तास संबंधित रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जातो. खड्डे भरणीची कामे सुस्थितत होण्यासाठी नागरिक, वाहन चालकांनी पर्यायी रस्ते मार्गाचा अवलंब करून पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.