महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आयोजित मुंबई ओपन टेनिस लीग स्पर्धेसाठी ठाण्यातील धायगुडे स्पोर्ट्स अकादमीचा डेडली शार्क्‍स ठाणे संघ सज्ज झाला आहे. क्रिकेटमधील बहुचर्चित आयपीएलच्या धर्तीवर आयोजित केलेली ही लीग स्पर्धा १० वर्षे, १२ वर्षे आणि १४ वर्षे गटातील मुले-मुलींचा समावेश असलेली ही स्पर्धा विविध संघांमध्ये रंगणार आहे.

या स्पर्धेत डेडली शार्क्‍स ठाणे संघासह ग्रिझली बिअर्स अंधेरी, रँगिंग बल्ज, राइझिंग इगल्स, फ्लाइंग होंक्स आणि होवलिंग वूलस दादर या संघाचा समावेश आहे. धायगुडे स्पोर्ट्स अकादमीचे संचालक आणि प्रमुख प्रशिक्षक तुषार धायगुडे हे या संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहेत.

प्रत्येक संघातील खेळाडूंची निवड त्यांच्या मुंबई, राज्य आणि अखिल भारतीय क्रमांकावरून करण्यात आली आहे. डेडली शार्क्‍स ठाणे संघात करीम खान, लेस्टन वाझ, नील पिल्लई, वीर शाह,

नीरव शेट्टी, अर्धिय तटकरे, सिया बौर, सोहा पाटील, साची पटवर्धन, आदित्य तलाठी, आकांश सुब्रमण्यम, अक्षय सुब्रमण्यम, नीलय भोळे या खेळाडूंचा समावेश आहे.

ठाण्यातील पंकज सिंगची रग्बी संघात निवड

आशियन स्कूल स्पोर्ट्स फेडरेशन संस्थेतर्फे दुसरी आशियन स्कूल रग्बी सेव्हन चॅम्पियनशिप स्पर्धेचे २२ ते २६ जुलै रोजी चीनमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या वेळी १८ वर्षांखालील मुलांचा संघ भारताकडून या स्पर्धेत सहभागी होणार आहे. या संघामध्ये ठाणे जिल्ह्य़ातील पंकज सिंग या खेळाडूची भारतातर्फे खेळणाऱ्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत भारताव्यतिरिक्त हाँग-काँग, सिंगापूर, मलेशिया, चीन, मोंगोलिया, थायलंड आदी देश सहभागी होणार असल्याची माहिती ठाणे जिल्ह्य़ाचे रग्बी खेळाचे कार्यवाह प्रमोद पारसी यांनी दिली. या खेळाडूंना ज्ञानेश्वर बागराव यांनी प्रशिक्षण दिले आहे.

अक्षय देवलकरचे दुसरे राष्ट्रीय पदक

ठाणेकर अक्षय देवलकरने दुसरे राष्ट्रीय बॅटमिंटन स्पर्धेत अंजिक्यपद पटकावून आपल्या कारकीर्दीमध्ये यशाचा तुरा रोवला आहे. २०१३ सालच्या खुल्या राष्ट्रीय बॅटमिंटन स्पर्धेनंतर त्याने हे दुसरे अंजिक्यपद पटकाविले. अक्षय याने आपला साथीदार प्रणव चोपडा याच्यासोबत खेळताना चंदीगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उपांत्य फे रीत

सात्त्विक साईराज आणि क्रिष्णा प्रसाद या जोडीचा २१-१७, २२-२० असा पराभव केला. त्यानंतर अंतिम फेरीत एलवीन फ्रान्सिस आणि तरुण कोना या जोडीचा २१-१७, २१-१९ या गुणांनी पराभव करून हे राष्ट्रीय अंजिक्यपदावर आपले नाव कोरले. त्याच्या या यशाबद्दल जिल्हा बॅटमिंटन असोसिएशनने त्याला एक लाख रुपयांचे विशेष पारितोषिक देऊन गौरविले. अक्षय खुल्या अमेरिकन स्पर्धेत तसेच खुल्या कॅनडियन ग्रॅडप्रिक्स स्पर्धेमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

रोझलीन लेवीसची आंतरराष्ट्रीय शालेय स्पर्धेत निव

तुर्की येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शालेय स्पर्धेत ठाणे जिल्ह्य़ातील रोझलीन लेवीस हिची निवड झाली आहे. या वेळी भारताला मिडले रीले स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. रोझलीन ही या रीले टीमची सदस्य आहे. शिवाय वैयक्तिक २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करून तिने सहावा क्रमांक पटकाविला असून ती फादर अ‍ॅग्नेल या शाळेची विद्यार्थिनी आहे.

Story img Loader