|| सागर नरेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निविदेतील रकमांवर आक्षेप?; बदलापुरातील खेळाडू वंचित

बदलापूर पूर्वेला प्रस्तावित असलेल्या बहुचर्चित क्रीडा संकुलाचा पहिला टप्पा जीवन प्राधिकरणाच्या मंजुरीअभावी रखडला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या प्रकल्पाला मोठे महत्त्व आहे. नगरपालिकेच्या प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी देण्याचे अधिकार जीवन प्राधिकरणाला असल्याने सल्लागार संस्थेने जुलैमध्ये हा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवला होता. मात्र, प्राधिकरणाने प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंच्या रकमांवर प्रश्नचिन्ह उभे केल्यामुळे मंजुरी रखडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

बदलापूर शहरातील खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांत यश मिळावे, यासाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत सोयीसुविधा असेलेले क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी बदलापूर पूर्वेतील ५५ एकरचे भले मोठे क्षेत्र आरक्षित आहे. त्यापैकी बराच भाग डोंगराळ असल्याने त्याच्या विकासासाठी वेळ लागणार आहे. पुढील दोन वर्षांत यापैकी नऊ एकरांवर क्रीडा संकुलाचा पहिला टप्पा तयार व्हावा यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीने मे महिन्यात पहिल्या टप्प्याचा आराखडा नगरपालिकेला सादर केला. टेनिस कोर्ट, बंदिस्त संकुल आणि मैदानी खेळांसाठी लाल मातीचे मैदान इत्यादींचा समावेश या आराखडय़ात आहे. अडीच एकरांत तयार होणाऱ्या लाल मातीच्या मैदानात खेळाडूंसाठी व्यायामशाळा आणि कपडे बदलण्याची जागा निश्चित करण्यात आली. बंदिस्त संकुलात ६०० प्रेक्षक बसतील अशी रचना करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ३१ हून अधिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा येथे घेता येणार आहेत. त्यासाठी एकूण २४ कोटी ६५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. वेळेत निधी उपलब्ध झाल्यास आणि कामाची सुरुवात वेळेत झाल्यास १८ महिन्यांत पहिला टप्पा पूर्ण होण्याची शक्यता होती. मात्र निधी उपलब्ध नसणे आणि तांत्रिक मंजुरीचा अडथळा असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

याबाबत कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ  शकला नाही. या प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या अभियंत्यांना विचारले असता त्यांनी या रखडपट्टीला दुजोरा दिला. सल्लागार संस्था पाठपुरावा करत असून प्रकल्पाच्या तांत्रिक मंजुरीला वेळ लागत असल्याचे पालिका अभियंत्यांनी स्पष्ट केले. या विषयावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र तो होऊ  शकला नाही.

जीवन प्राधिकरणाच्या मंजुरीची प्रतीक्षा

प्रकल्पाचे सल्लागार शशी प्रभू अँड असोसिएट्स यांनी पहिल्या टप्प्याच्या तांत्रिक मंजुरीसाठी ३ जुलैला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला प्रस्ताव सादर केला होता. प्राथमिक पडताळणी १५ दिवसांत झाल्यानंतर अधीक्षक अभियंत्यांकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या बाजारभावावर आता चार महिन्यांनंतर आक्षेप घेण्यात आला आहे. आणखी विलंब झाल्यास पुढील प्रक्रियाही लांबणीवर पडतील, अशी भीती आहे. तशा आशयाचे पत्र सल्लागार कंपनीने कुळगाव बदलापूर पालिकेला दिल्याचे कळते. त्यावर काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.