वागळे इस्टेट येथे दोन कार घेऊन दरोडा घालण्यासाठी आलेल्या एका टोळीतील तिघांना श्रीनगर पोलिसांनी शनिवारी अटक केली. नवीन सिंग (२६), चंद्रकांत पुजारी (३८), विश्वजीत डांगळे (२३) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून उर्वरित चार जणांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कार, दरोड्यासाठी लागणारे लोखंडी पाने, स्क्रू ड्रायव्हर, चार कटावणी, एक चाकू, मिरची पूड, हातमोजे, मुखपट्टी, टोपी असे साहित्य जप्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>चार महिन्यात १९५ कोटी मालमत्ता कर वसुलीचे आव्हान ;‘कडोंमपा’ची मागील आठ महिन्यात १८० कोटी वसुली

वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक १८ येथे काहीजण दरोडा घालण्यासाठी येणार असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे, शनिवारी पहाटे श्रीनगर ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक माणीक इंगळे, वसंतराव तारडे यांनी पथकासह सापळा रचला होता. त्यावेळेस पोलिसांना कारमधून काहीजण संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले. पथकाने तात्काळ यातील दोन कार रोखल्या आणि नवी नवीन सिंग, चंद्रकांत पुजारी आणि विश्वजीत डांगळे यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्या कारमध्ये पोलिसांनी तपासणी करून दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. त्यांच्या इतर साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srinagar police arrested a gang who came to commit car robbery amy