ठाणे येथील टेंभीनाका परिसरात शुक्रवारी सकाळी ठाण्याहून भिवंडीकडे निघालेल्या राज्य परिवहन उपक्रमाच्या (एसटी) बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. ही बाब बस चालकाच्या निदर्शनास येताच त्याने दिलेल्या महितीनंतर प्रवाशी बसमधून खाली उतरले. बस चालकाच्या या सतर्कतेमुळे ७० प्रवाशी बचावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- कल्याण-डोंबिवलीतील रस्ते खड्डेमय; सुस्थितीत रस्ते खोदून सेवा वाहिन्या टाकण्यास नागरिकांचा विरोध

ठाणे स्थानकातील राज्य परिवहन उपक्रमाच्या आगारातून शुक्रवारी सकाळी ठाणे- भिवंडी ही बस निघाली. या बसमध्ये ७० प्रवासी होते. भिवंडी आगाराची ही बस असून तिचा क्रमांक एमएच १४ बीटी १८९७ असा आहे. या बसवर आनंद विठोबा सवारे हे चालक तर, गणपत बाबुराव बिराजदार हे वाहक होते. ही बस ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील जैन मंदिर जवळ येताच बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. ही बाब बस चालक आनंद यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने ही बाब प्रवाशांना सांगितली. त्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांची बसमधून खाली उतण्यासाठी धावपळ सुरू झाली. बसच्या दाराजवळ गर्दी असल्यामुळे काही प्रवासी खिडकीतून खाली उतरले.

हेही वाचा- येऊरच्या जंगलात ३५० किलो कचरा

त्याचवेळी तिथे आलेले माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहीती दिली. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमधील चालक, वाहक, स्थानिक रहिवाशी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने बसमध्ये लागलेली आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus going from thane to bhiwandi caught fire 70 passengers were saved due to the alertness of the driver dpj