रमेश पाटील
तालुक्यात दररोज ४० ते ५० फेऱ्या रद्द; खासगी प्रवासी वाहतूक जोमात
‘ग्रामीण भागातील जीवनवाहिनी’ असे जिचे वर्णन केले जाते, त्या एसटी वाहतुकीची अवस्था वाडा तालुक्यात अत्यंत भीषण आहे. बसगाडय़ा वेळेवर न सोडणे, ऐनवेळी बस रद्द करणे, कमी उत्पन्नाची सबब सांगणे अशा विविध कारणांमुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या ४० ते ५० फेऱ्या दररोज रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांचा प्रवाशांना आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना असुरक्षित प्रवास करावा लागत असून पैशांचाही अपव्यय होत आहे.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असलेली एसटी वाडा तालुक्यातील ग्रामीण भागांत प्रवाशांसाठी बिनभरवाशाची ठरली आहे. तालुक्यात असलेल्या १६५ गावांतील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी एसटी बस हा चांगला पर्याय आहे. मात्र अनेकदा वेळेवर गाडय़ाच मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी एसटी बस वेळेवरच येत नाहीत, तर कोणतेही कारण न सांगता बसफेऱ्या रद्द केल्या जातात.
फेरी रद्द झाल्याने मासिक पासधारक प्रवासी, सवलतीच्या दराने प्रवास करणारे विद्यार्थी यांना नाहक फटका बसतो. त्यांच्याकडे खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांशिवाय दुसरा पर्याय नसतो. या बेकायदा वाहनांमध्ये अक्षरश: कोंबून प्रवास करावा लागत आहे.
तालुक्यात जवळपास तीन हजार विद्यार्थी अर्धसवलतीचा मासिक पास काढून एसटी बसने प्रवास करतात. मात्र ७० टक्के फेऱ्या रद्द केल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे. दररोज दूध, भाजीपाला घेऊन जाणाऱ्या लहान व्यावसायिकांवरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यांनाही खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागतो.
वाडा एसटी आगार तोटय़ात असल्याने अनेक गाडय़ांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. ग्रामीण भागांतून अत्यंत कमी उत्पन्न मिळत असल्याचे वाडा एसटी आगाराचे प्रमुख व्ही. एन. गायकवाड यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना पगार द्यायला आणि गाडीत डिझेल टाकायला आगाराकडे पैसे नाहीत. ग्रामीण भागांतून अत्यंत कमी उत्पन्न मिळत असल्याने अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत.
– व्ही. एन. गायकवाड, आगार प्रमुख, वाडा
अनेक बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे लहान मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे.
– सारिका पाटील, महिला प्रवासी.