ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडली परिसरात सोमवारी एसटी महामंडळाच्या बसला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक झाली. एसटीत शॉटसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या आगीत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. आग लागल्यानंतर एसटीतील चालक आणि प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

Story img Loader