बदलापूर : गेली काही वर्षे विविध कारणांमुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या बदलापूरांना जलदिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत २६० कोटी रूपयांच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली. यात दोन नवे जल शुद्धीकरण केंद्र, १४ जलकुंभ, नव्या जलवाहिन्या असणार आहेत. २०५६ वर्षाच्या अंदाजे साडे सात लाख लोकसंख्येला पुरेल इतक्या पाण्याची क्षमता या योजनेच्या माध्यमातून निर्माण केली जाणार आहे.

वितरण व्यवस्था, त्याची क्षमता आणि जलाकुंभांचा अभाव यामुळे गेल्या काही वर्षांपासून बदलापूर शहराला पाणी समस्येने ग्रासले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र जलकुंभ पासून शेवटच्या टोकावर असलेल्या घरांना पाणी कमी दाबाने मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे बदलापूर शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी मुरबाड विधानसभा मतदारसंघांचे आमदार किसन कथोरे यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत २६० कोटी रूपयांच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली आहे. येत्या २०५६ वर्षापर्यंत वाढणाऱ्या सुमारे ७ लाख ६२ हजार लोकसंख्येला पाणी पुरवण्याची क्षमता यामुळे निर्माण होणार आहे. त्यामुळे येत्या ३२ वर्षांची पाणी व्यवस्था होणार आहे. वाढीव पाणी पुरवठा योजनांमुळे बदलापुर आणि मुरबाडमधील नागरिकांना निश्चितच दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?

हे ही वाचा… ठाण्यात रिक्षाचालकांच्या मनमानीचा प्रवाशांना फटका; नियमांनाही हरताळ

योजना

या योजनेत उल्हास नदीकिनारी वालिवली येथे विहीर तयार केली जाईल. खरवई आणि बेलवली येथे अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम विभागासाठी जल शुद्धीकरण केंद्र उभारले जाईल. त्यात खरवई येथे ५४ दशलक्ष लिटर क्षमतेचे आणि बेलवली येथे ६० दशलक्ष लिटर क्षमतेचे केंद्र असेल. बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम विभागात सुरळीत पाणी वितरणासाठी १४ जलकुंभ उभारले जातील. तसेच अद्यायावत उपसा पंप आणि जलवितरण यंत्रणा उभारली जाईल.

हे ही वाचा… ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाची पुन्हा चर्चा, ठाणे पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक

मुरबाडसाठीही नवी योजना

नगरोत्थान अभियानातून मुरबाड शहरासाठीही ३१ कोटी १८ लाख रूपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. २०५६ ची संभाव्य लोकसंख्येला पुरेल असे योजनेचे नियोजन आहे. मुरबाड तालुक्यातील शिरवली ठाकुरवाडी धरण पाण्याचा स्त्रोत असणार आहे. यात सहा नवे जलकुंभ उभारले जाणार आहेत.