ठाणे : उथळसर प्रभाग समिती जवळील दर्ग्यासमोर मंगळवारी सकाळी ठाणेहून भिवंडीच्या दिशेने जात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आग लागली. या घटनेनंतर सतर्क झालेल्या चालकाने बस लागलीच रस्त्याच्या बाजूला घेऊन ६५ प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ठाणेहून भिवंडीच्या दिशेने जात होती. भिवंडी आगाराची ही बस होती. या बसमध्ये चालक आनंद विठोबा सवारे आणि वाहक अजित नामदेव कांबळे यांच्यासह ६५ प्रवाशी प्रवास करीत होते. उथळसर प्रभाग समिती जवळील दर्ग्यासमोर बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. ही बाब निदर्शनास येताच चालक आनंद विठोबा सवारे यांनी बस लागलीच रस्त्याच्या बाजूला घेतली. तसेच बसमध्ये आग लागल्याची सूचना देत प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर भेदरलेल्या प्रवाशांनी बसमधून खाली उतरण्यासाठी गर्दी केली.

wheel of ST bus running on Vasai Vajreshwari route came off
वसई वज्रेश्वरी मार्गावर चालत्या एसटीचे चाक निखळले
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
Finance Minister approves purchase of 25000 privately owned st buses in five years
गाव तेथे नवी एसटी धावणार; पाच वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या ‘लाल परी’ बस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता
Development works worth one thousand crores will be done in Nagpur says chandrashekhar bawankule
उपराजधानीत एक हजार कोटींची विकासकामे होणार; कारागृह, बसस्थानकांसह…
Huge displeasure among passengers over ST fare hike Mumbai news
एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी
15 year old girl dies in school bus accident
आई-वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचा स्कूल बस अपघात मृत्यू
A youth died in a bus accident near Gorai Agar Mumbai news
गोराई आगारातील बसने तरुणाला चिरडले,भाडेतत्वावरील बस अपघातांच्या घटनांचे सत्र सुरुच

हेही वाचा – महापालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना दिलासा, ४५ वर्षांवरील कामगारांना कामावरून न काढण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

काही वेळातच सर्व प्रवाशी बसमधून खाली उतरले. दरम्यान या बसला आग लागली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळताच जवाहरबाग अग्निशमन केंद्राचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बसला लागलेली आग बसमधील चालक, वाहक, स्थानिक रहिवाशी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली.

Story img Loader